महाराष्ट्रात वारं फिरलं, 27, 28 आणि 29 ला धो धो पाऊस, 85 किमीच्या वेगाने येतंय वादळ, आज राज्यात

राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून, भारतीय हवामान विभागाने आगामी काही दिवसांसाठी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (weather) काही भागांत उष्णतेचा तडाखा जाणवण्याची शक्यता असतानाच, राज्यातील विविध जिल्ह्यांत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यांचा प्रभाव दिसू शकतो. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मुंबईसह उपनगरांमध्ये सध्या उकाडा वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. कोकण आणि मुंबई परिसरात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याचा अंदाज असला, तरी रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोकण किनारपट्टीच्या काही भागांत पावसाची शक्यता आहे. (weather) दरम्यान, अरबी समुद्रातील हवामानातील घडामोडी आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे काही भागांत वादळी हवामान निर्माण होऊ शकते.

हवामानाच्या अंदाजानुसार, २७ आणि २८ ऑक्टोबर रोजी विदर्भातील काही जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. (weather) त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यातील काही भागांत उष्णता वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.दुसरीकडे, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. चक्रीवादळाचा महाराष्ट्राला थेट धोका नसल्याचे सांगितले जात असले, तरी हवामानातील बदलांमुळे काही भागांत पावसाची शक्यता नाकारता येत नाही. नागरिकांनी भारतीय हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांकडे लक्ष द्यावे.

हेही वाचा : 

दिवाळीआधीच मोठी खुशखबर धडकणार सरकारी कर्मचाऱ्यांचा DA वाढणार

आनंदाची बातमी सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव

आंध्रातील चक्रीवादळाचा कोल्हापूरला तडाखा दुष्काळी जिल्ह्याला दिलासा