पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यासंबंधी मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना नुकताच 23 वा हप्ता मिळाला आहे. (farmers) त्यानंतर पुढील हप्त्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारची पीएम किसान योजना लोकप्रिय योजनांपैकी एक आहे. या योजनेत शेतकर्यांना आर्थिक लाभ मिळतो. गेल्या महिन्यात 20 जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन 23 वा हप्ता जमा केला होता. या योजनेत दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सहा हजार रुपये जमा करण्यात येतात. तीन महिन्याच्या कालावधीनंतर दोन हजार रुपये जमा करण्यात येतात. आता 24 व्या हप्त्याविषयी मोठी अपडेट समोर आली आहे.
पीएम किसान योजनेतंर्गत चार महिन्यांनी हप्ता जमा करण्यात येतो. 20 जून रोजी 23 वा हप्ता जमा करण्यात आला होता. आता ऑक्टोबर 2026 मध्ये पीएम किसानचा पुढील हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. (farmers) त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील. पण त्यासाठी ई-केवायसी आणि इतर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. 20 ऑक्टोबरपर्यंत हा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे. तर काही दाव्यानुसार हा हप्ता नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळू शकतो. अर्थात याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही.पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे. या डिजिटल प्रणालीत प्रत्येक शेतकर्याला एक युनिक फार्मर आयडी दिला जातो. शेतीसंबंधीत योजना, पीक विमा आणि अनुदानाचा थेट लाभ मिळण्यासाठी ही नोंदणी बंधनकारक आहे. पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसीसोबतच ॲग्रीस्टॅक नोंदणी आवश्यक आहे.
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी ही कागदपत्रे आवश्यक
आधार कार्ड, तुमच्या मोबाईल क्रमाकांशी संलग्नित
जमिनीचा 7/12 उतारा, 8-अ
बँक पासबुक गरजेचे
तर अडकू शकतो तुमचाही हप्ता
ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल तर शेतकऱ्यांना पीएम किसानचा नवीन हप्ता मिळणार नाही. शेतकऱ्यांनी वेळेपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. सोबतच शेतजमिनीचा पडताळा, आधार लिकिंग आणि दस्तावेजातील नावातील चूक हे लागलीच दुरूस्त करणे आवश्यक आहे.मागील हप्ता मिळाला नसेल तर pmkisan.gov.in या पोर्टलवर जाऊन फार्मर कॉर्नरवर लॉगिन करणे आवश्यक आहे. ‘Know Your Status’ हा पर्याय निवडून स्टेट्स चेक करा. त्यात ‘Land Seeding’ वा ‘e-KYC’ समोर ‘No’ असे समोर आल्यास तात्काळ CSC केंद्रावर जाऊन ती माहिती अपडेट करा. तुम्ही ही माहिती घरबसल्याही अपडेट करू शकता. फार्मर कॉर्नरवर एडिट अथवा अपडेट आधार, बँकेचा तपशील हा पर्याय निवडावा. तिथे तुमचे योग्य नाव, बँकेचा योग्य खाते क्रमांक, IFSC क्रमांक टाकावा. त्यानंतर ही माहिती योग्य आहे की नाही याचा पडताळा करावा. (farmers) त्यानंतर ही माहिती सबमिट करावी.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?