भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात स्वदेशी शक्तीची भर सागरी सुरक्षेला मिळालं नवं बळ, अचानक नेमकं काय घडलं?

भारतीय सागरी सुरक्षेसाबत महत्वाची अपडेट हाती आली आहे. मागील एका महिन्यात भारतीय नौदलाच्या ताफ्यात 4 युद्धनौका सामील झाल्या आहेत. त्यामळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवं बळ मिळालं आहे.

भारतीय सागरी सुरक्षेसाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी एका स्वदेशी शक्तीची भर पडलीये. सध्या निलगीरी, संधायक आणि अर्नाळा वर्गाच्या युद्धानौका सागरी युद्ध, जलसर्वेक्षण आणि किनारी पाणबुडीविरोधी कारवायामध्ये आघाडीवर आहेत. (Indian maritime) त्यात आयएनएस दुनागरी, आयएनएनस शोधन, आयएनएस अग्रय आणि आयएनएस महेंद्रगिरी भारतीय नौदलात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भारताच्या सागरी सुरक्षेला नवे बळ मिळालं आहे.भारताच्या नौदलावर सुमारे 11,098 किमी लांब किनारा, सुमारे 24 लाख चौरस किलोमीटर,90 टक्के व्यापारी संरक्षणाची जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आता भारताकडे मोठा ताफा आहे. या ताफ्यात स्टेल्थ फ्रिगेट्स, सर्वेक्षण जहाजे, अर्नाळा श्रेणीची पाणबुडीविरोधी युद्धनौका यांचा समावेश झाला आहे.

आयएनएस दुनागिरी, आयएनएस संधायक, आयएनएस अग्रय या युद्धनौका 21 जून 2026 जून रोजी कोलकात्यात भारतीय नौदलात सामील झाल्या. त्यानंतर 11 जुलै 2026 रोजी प्रोजेक्ट 17A अंतर्गत विकसित करण्यात आलेली INS महेंद्रगिरी ही युद्धनौका सामील झाली. (Indian maritime) यामुळे हिंदी महासागर आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रात भारताची सामरिक ताकद अधिक भक्कम झाल्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व युद्धनौका भारतीय नौदलाच्या वॉरशिप डिझाइन ब्युरोने केली आहे. प्रकल्प 17 अ अंतर्गत विकसित करण्यात आलेल्या निलगिरी श्रेणीच्या स्टेल्थ फ्रिगेट्स भारतीय नौदलात भरपूर महत्त्वाच्या मानल्या जातात. या युद्धनौका 149 मीटर लांब आणि 6,670 टन वजनाच्या आहेत. या युद्धनौका 28 नॉट्सपर्यंत वेग गाठू शकतात. त्याचबरोबर ताफ्यात ब्रह्मोस क्षेपणास्त्रे, हेलिकॉप्टर इत्यादी देखील सज्ज आहेत.

दरम्यान, सर्वेक्षण करणारी जहाजे देखील भारतीय नौदलाची जलसर्वेक्षण क्षमता बळकट करतात. सुमारे 110 मीटर लांब आणि 3400 टन वजनाची जहाजे ही समुद्रतळाचा नकाशा तयार करतात. तसेच नौकानयन नकाशे तयार करणे आणि सागरी माहिती गोळा करतात. (Indian maritime) यामुळे सागरी व्यापार, ब्लू इकॉनॉमी आणि मित्र राष्ट्रांसोबतच्या जलसर्वेक्षण सहकार्याला चालना मिळते. आयएनएस संधायक हे या श्रेणीतील चौथे आणि अंतिम जहाज असल्याची सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :

मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?

चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?

उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा धक्का बसणार? 15 आमदार फुटणार?