तेल कंपन्यांकडून एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर घरगुती आणि कमर्शियल गॅस सिलिंडरच्या दरात बदल बुकिंग करण्यापूर्वी जाणून घ्या आजचे दर किती एलपीजी गॅस सिलिंडर वापरणाऱ्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. तेल कंपन्यांनी आज घरगुती गॅस सिलिंडर आणि कमर्शियल गॅस सिलिंडरचे नवे दर जारी केले आहेत. दिल्ली, मुंबई,पाटणा आणि लखनऊसह (gas cylinder) अनेक शहरांमध्ये गॅस सिलिंडरचे दर बदलले आहेत. जर तुमचा गॅस सिलिंडर संपणार असेल आणि तुम्ही नवीन सिलेंडर बुक करण्याचा विचार करत असाल तर बुकिंगपूर्वी लेटेस्ट दर जाणून घेणं गरजेचे राहिल.

इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅस या तेल कंपन्यांनी गॅस सिलेंडरचे नवीन दर जाहीर केले आहेत. (gas cylinder) काही दिवसांपूर्वी कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर कमी झाले होते. पण १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर होते. नव्या दरानुसार, राजधानी दिल्लीमध्ये १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४२ इतके आहे, तर १९ किलोच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत २,९३० रुपये इतकी आहे. मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९४१.५० रुपये इतकी आहे. तर कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत २,८८५.५० रुपये इतकी आहे.
कोलकातामध्ये आज घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९६८ रुपये इतकी आहे. १९-किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत ३,०८१.५० रुपये इतकी आहे. चेन्नईमध्ये आज घरगुती गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी ग्राहकांना ९५७.५० रुपये खर्च करावे लागतील. तर व्यावसायिक गॅस सिलिंडरची नवीन किंमत ३,१०६ रुपये इतकी आहे.नोएडामध्ये आज घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९३९.५० रुपये इतकी आहे. तर लखनऊमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत ९७९.५० रुपये इतकी आहे. बिहारच्या पाटणा येथे आज घरगुती गॅस सिलिंडरची किंमत देशातील (gas cylinder) इतर प्रमुख शहरांच्या तुलनेत सर्वाधिक असून येथील ग्राहकांना गॅस सिलिंडर खरेदीसाठी १,०३१.५० रुपये खर्च करावे लागतील. जयपूरमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचे दर ९४५.५० रुपये इतके आहे. तर कमर्शियल गॅस सिलिंडरचे दर २,९५७.५० रुपये इतके आहे.
हेही वाचा :
मिरज पंचायत समितीत पुढचा सभापती भाजपचा?
चीनला मोठा दणका, भारताजवळ बांधत होता धरण, ब्रह्यपुत्र नदीवर थेट?