15 दिवसांत दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना एकत्र येतील, सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री, तर सुनेत्रा पवार आमदाराच्या दाव्याने खळबळ?

राज्याच्या राजकारणात सध्या काहीही अशक्य राहिलेले नाहीये असे आम्ही का म्हणतोय कारण गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या. (politicians) आशातच आज पुन्हा जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समवेत भेट घेतली. या सगळ्या घडामोडीवर आमदार रवी राणा यांनी राजकीय भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चाना उधाण आले आहे.

आमदार रवी राणा यांनी दावा केला आहे की, येणाऱ्या अवघ्या पंधरा दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील. एवढेच नव्हे तर या विलिनीकरणानंतर सुप्रिया यांची केंद्र सरकारमधहीए मंत्री म्हणून वर्णी लागेल, (politicians) तर राज्याची धुरा सुनेत्रा पवार सांभाळतील असेही त्यांनी म्हटले आहे.

उद्धव ठाकरे यांनी देखील आता प्रभू श्रीरामाच्या आणि भगवंताच्या विचारांचा स्वीकार केला आहे. (politicians) त्यामुळे भविष्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते सुद्धा पुन्हा एकत्र येऊ शकतात अशी भविष्यवाणी रवी राणा यांनी केली आहे. राजकारणामध्ये आता अशक्य गोष्टीही शक्य झाल्या आहेत, असे म्हणत रवी राणा यांनी महाराष्ट्राच्या आगामी राजकीय समीकरणांबाबत अत्यंत मोठे संकेत दिले आहेत. त्यामुळे येणाऱ्या 15 दिवसांत काय घडामोडी घडतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?