इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

पंतप्रधान ई-बससेवा अंतर्गत मंजूर बसेसपैकी १० अत्याधुनिक ई-बसेस लवकरच शहरात दाखल हाेत असल्याने अनेक वर्षांपासूनची प्रतिक्षा संपली आहे. या बसेसमुळे शहरवासियांना आरामदायी आणि सुविधाजनक प्रवासाचा लाभ लवकरच मिळणार आहे, (approved) अशी माहिती परिवहन समिती सभापती अरुणा बचाटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. शहरात बससेवा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययाेजनाही गतीने सुरू आहेत. इचलकरंजीसाठी पहिल्या टप्प्यात २० ई-बस मंजूर झाल्या आहेत. या अनुषंगाने संबंधित सेवा पुरवणारी कंपनी व महापालिका यांच्यात करारही झाला आहे. साेलगे मळा येथे ३८ गुंठे जागेत ई-बसस्थानक उभारण्यात येत आहे. प्रशासकीय इमारतीसह चार्जिंग स्टेशन, वाॅशिंग सेंटर आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी स्वतंत्र विद्युत यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

१४ काेटींच्या रकमेतून ही सर्व कामे पूर्णत्वास जात आहेत. इचलकरंजीसह परिसरातील २० किलाेमीटरच्या आतील गावांना लाभ मिळणार आहे. ही सेवा पुलाची शिराेली, कागल, कुरुंदवाड, हातकणंगले, पेठवडगांव, जयसिंगपूर, आयकाे सूतगिरणी अशी असणार आहे. शहरातील काही भागात ही सेवा असणार आहे. या ई बसेसपैकी काही बसेस या ३२ तर काही बसेस या ४४ प्रवाशी क्षमतेच्या असणार आहेत. वातानुकुलितमुळे प्रवाशांचा आरामदायी प्रवास करता येणार आहे. शहरातील सहवास कट्ट्यांचा उपङ्माेग बस थांब्यासाठी करण्यात येणार आहे. (approved) शिवाय आवश्यक ठिकाणी १ ते २ किलाेमीटर अंतरावर थांबे उभारण्यात येणार असल्याचेही सभापती बचाटे यांनी सांगितले.

ई-बस सेवेसाठी श्री शिवतीर्थ परिसरात बस स्थानक उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. (approved) याठिकाणी असलेले दुकानगाळे व स्टॅम्प व्हेंडर यांचे याेग्य जागी पुनर्वसन करण्यात येणार आहे. या संदर्भात निर्माण झालेला वाद संपुष्टात आला असून बस स्थानक उभारण्याचा मार्ग माेकळा झाल्याचे महापाैर उदय धातुंडे यांनी सांगितले. याठिकाणच्या स्टॅम्प व्हेंडरसाठी बस स्थानकासाठी आवश्यक जागा माेजणीनंतर संरक्षक भिंत उभारुन त्यालगत पुनर्वसन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी उपमहापाैर अनिल डाळ्या, सभागृह नेते विठ्ठल चाेपडे, स्थायी सभापती सतीश मुळीक, मनाेज हिंगमिरे, प्रमाेद बचाटे, शशिकांत माेहिते उपस्थित हाेते.

हेही वाचा :

पंकजा मुंडेंना पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर राजकारणात खळबळ?

व्यसनमुक्त असणाराच खरा सत्संगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मंत्र?

आग लागली तपासाचा धूर दिसेना?