ST प्रवाशांसाठी मोठी बातमी NCMC कार्डच्या नियमांत बदल बायोमेट्रिक फेल झाल्यास आधार OTPचा पर्याय?

एसटीने प्रवास करणाऱ्या महिला आणि जेष्ठ नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एसटी महामंडळाच्या नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) संदर्भातली नोंदणी आणि वितरण प्रक्रियेत काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. बायोमेट्रिक जुळत नसल्याने ज्या प्रवाशांना कार्ड नोंदणी करताना अडचणी येत होत्या, (registration) त्यांना आता आधार OTPच्या माध्यमातून नोंदणी करण्याचा पर्याय मिळणार आहे.

२१ सप्टेंबरपासून आधार OTPचा पर्याय एसटीच्या NCMC कार्ड नोंदणी प्रोसेसमध्ये २१ सप्टेंबर २०२६ पासून आधार OTPच्या आधारे नोंदणी करता येईल. त्यामुळे बायोमेट्रिक पडताळणी अयशस्वी झालेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच कार्ड हरवलं तर १९९ रुपये शुल्क भरून नव्याने कार्ड घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. १९ सप्टेंबरपर्यंत NCMC कार्डसाठी नोंदणी करणाऱ्या प्रवाशांना २५ सप्टेंबरपासून कार्डचे वितरण केले जाणार आहे. (registration) दरम्यान, नोंदणी पूर्ण झाल्यानंतर प्रवाशांना QR कोड असलेली पावती देण्यात येत आहे. ही पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार असून, या कालावधीत पात्र प्रवाशांना सवलतीचे तिकीट मिळू शकणार आहे.

महिला आणि ६५ ते ७५ वर्षे वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना शासनाच्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी १ सप्टेंबरपासून NCMC कार्ड अनिवार्य करण्यात आले होते. मात्र कार्ड नोंदणी, सर्व्हरवरील ताण आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर NCMC कार्डची सक्ती ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली आहे. ज्या प्रवाशांचे NCMC कार्ड सक्रिय झाले आहे, (registration) त्यांनी सवलतीचा लाभ कार्डद्वारेच घ्यावा, अशा सूचना आगारांना देण्यात आल्या आहेत. मात्र कार्ड रीड न होणं किंवा अन्य तांत्रिक अडचणींमुळे कार्डद्वारे तिकीट देणं शक्य नसेल तर, पूर्वीच्या पद्धतीने सवलतीचे तिकीट देण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

‘हुपरी’ प्रकल्पातून आत्मनिर्भरतेचे पाऊल परकीय चलनात बचत?

भारत अफगाणिस्तान मालिकेदरम्यान 19 लोकांना अटक, पोलिसांनी असं का केलं?