इचलकरंजी महानगरपालिकेतील २२ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पावरून भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत. (Ichalkaranj) स्थायी समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मंजुरीसाठी मांडण्यात आला होता. मात्र, भाजपमधील आवाडे आणि हाळवणकर गटातील मतभेदांमुळे हा प्रस्ताव बहुमताने फेटाळण्यात आला.

सभापती सतीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापनासाठी २२ कोटी रुपयांचा आराखडा सादर करण्यात आला. मात्र, महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असताना एवढ्या मोठ्या खर्चाचा प्रकल्प राबवणे योग्य नसल्याचा मुद्दा उपस्थित करत हाळवणकर गटाचे नगरसेवक तानाजी पोवार यांनी तीव्र विरोध दर्शवला. (Ichalkaranj) त्यांच्या भूमिकेला विरोधी शिवशाहू आघाडीच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला.
दीर्घ चर्चेनंतर सभापतींनी मतदानाचा निर्णय घेतला. मतदानात प्रस्तावाच्या बाजूने केवळ ६ मते मिळाली, तर विरोधात ९ सदस्यांनी मतदान केले. परिणामी, २२ कोटी रुपयांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला स्थायी समितीने मंजुरी नाकारली या घडामोडीमुळे इचलकरंजीतील भाजपमधील गटबाजी पुन्हा एकदा स्पष्टपणे समोर आली असून, आगामी महापालिका राजकारणावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Ichalkaranj) तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावरही आता नव्याने चर्चा सुरू होण्याची चिन्हे आहेत.
हेही वाचा :
पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?