श्रीलंका कसोटी दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या वेळापत्रकात बदल, आता फक्त 3 दिवसांचा होणार सामना?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पोहोचण्यासाठी भारताला यापुढे प्रत्येक कसोटी सामना महत्त्वाचा आहे. (Indian team) अशा स्थितीत भारतीय संघ यासाठी श्रीलंका दौरा करणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. पण या दौऱ्यापूर्वी एक मोठा बदल करण्यात आला आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. 15 ऑगस्टपासून या मालिकेला सुरूवात होणार आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. कारण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीचं गणित सोडवायचं असेल, तर ही मालिका 2-0 ने जिंकणं भाग आहे. अन्यथा भारताचं गणित खूपच किचकट होईल. असं असताना या मालिकेपूर्वी टीम इंडिया लोकल श्रीलंकन इलेव्हनसोबत एक वॉर्म मॅच खेळणार आहे. या सामन्याच्या वेळापत्रकात एक बदल करण्यात आला आहे. या सराव सामन्याचा एक दिवस कमी करण्यात आला आहे. (Indian team) यापूर्वी हा सामना चार दिवसांचा असल्याचं सांगितलं गेलं होतं, पण आता तीन दिवसांचा होणार आहे. हा सराव सामना 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान कोलंबोच्या एनसीसी ग्राउंडमध्ये खेळला जाईल. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यासाठी 4 ऑगस्टला रवाना होणार आहे.

बीसीसीआयने संघ निवडीच्या वेळी चार दिवसांचा सराव सामना असेल अशी घोषणा केली होती. पण आता बदल झाल्याची माहिती संघाला दिली गेली आहे. पण या सामन्याचा एक दिवस कमी करण्याचं कारण काय ते अद्याप कळू शकलेलं नाही. पण बीसीसीआय आणि टीम मॅनेजमेंटच्या सूत्रांनी सराव सामन्यात बदल झाल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. जून महिन्यात भारताने शेवटचा कसोटी सामना खेळला होता. अनौपचारिक कसोटी सामना अफगाणिस्तानविरुद्ध खेळला आणि जिंकला होती. त्यामुळे मागच्या एक महिन्यात कसोटी भारताची तयारी कशी आहे, याचा अंदाज बांधणं कठीण आहे. त्यामुळे हा सराव सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. सर्वात चांगली बाब म्हणजे हा वॉर्म अप सामना लाईव्ह टेलिकास्ट केला जाणार आहे.

टीम इंडियाचा श्रीलंका दौरा
3-दिवसीय वॉर्म-अप सामना: 7 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट (एनसीसी ग्राउंड, कोलंबो)
पहिला कसोटी सामना: 15 ऑगस्टपासून (गाले इंटरनेशनल स्टेडियम)
दुसरा कसोटी सामना : 23 ऑगस्टपासून (एसएससी स्टेडियम, कोलंबो)

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत भारताला एकूण 9 सामने खेळायचे आहेत. त्यापैकी 7 सामन्यात विजय मिळवला तर अंतिम फेरीचं तिकीट मिळेल. (Indian team) त्यामुळे ही मालिका किती महत्त्वाची आहे याचा अंदाज येतो.भारतीय श्रीलंकेविरुद्ध 2, न्यूझीलंडविरुद्ध 2 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यामुळे भारतासमोरचं आव्हान वाटतं तितकं सोपं नाही.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?