जयंत पाटील यांचा महायुतीच्या नेत्यांना धक्का?

राज्यात सत्ता महायुतीची. नगरविकास मंत्रीपद शिवसेनेकडे, तरीही ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या अपात्रतेला स्थगिती आणून राष्ट्रवादीचे (श. प.) नेते आ. जयंत पाटील यांनी ईश्वरपुरातील महायुतीच्या नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. माहितीचा डाव त्यांच्यावर पलटवत, विरोधी पक्षात असलो तरी मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्यासोबत आपले घनिष्ठ संबंध असल्याचे त्यांनी दाखवून दिल आहे.

अवैध बांधकाम प्रकरणात दोषी धरून जिल्हाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवले होते. त्यामुळे ईश्वरपूरच्या राजकारणात एकच खळबळ माजली होती. नगराध्यक्षांना अपात्र ठरवून महायुतीने जयंत पाटील यांना धक्का दिल्याची चर्चा होती. जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे विरोधी महायुतीत आनंदाचे वातावरण होते. (disqualification) मात्र त्यांचा आनंद नगरविकास मंत्रालयाच्या निर्णयामुळे फार काळ टिकला नाही.

नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व त्याचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांना अपात्र ठरवल्यानंतर राष्ट्रवादीच्या आणखी पाच नगरसेवकांच्या विरोधात तक्रार करण्याची तयारी महायुतीकडून सुरू होती. मात्र अपात्रतेला स्थगिती देऊन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी (disqualification) आपल्या कार्यकर्त्यांना तोंडावर पडल्याची चर्चा पालिका वर्तुळात आहे. नगरविकास विभागाच्या या निर्णयानंतर आता महायुतीचे नेते पुढे काय भूमिका घेतात ते पाहावे लागेल. सध्या तरी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे व नगरसेवक सुनील मलगुंडे यांना नगरविकास मंत्रालयाने मोठा दिलासा दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एनडीएमध्ये सामील होणार असल्याची चर्चा आहे. आ. जयंत पाटील यांनी (disqualification) काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट नगराध्यक्ष अपात्रतेसंबंधित होती, असा खुलासाही त्यांनी नंतर केला होता. मात्र अलीकडे या गाठीभेटी वाढल्याने तसेच ईश्वरपूर येथील राजस्व अभियानात जयंत पाटील यांनी महसूल मंत्र्यांचे केलेले कौतुक यामुळे जयंत पाटील यांची महायुतीशी जवळीक वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच जयंत पाटील यांना दिलासा दिला असावा, असाही तर्क लढवला जात आहे.

नगरविकास खाते शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या विरोधात शिवसेनेचे जयकर जाधव यांनी तक्रार केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांचेही घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे अपात्रतेचा वाद नगर विकास मंत्र्यांच्या कोर्टात गेल्यानंतर नगरविकास खाते जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश कायम ठेवतील, असा सर्वांचा अंदाज होता. मात्र नगर विकास मंत्री शिंदे यांनी जयंत पाटील यांना सॉफ्ट कॉर्नर दिल्याचे दिसत आहे.

हेही वाचा :

पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?

अजिंक्यच्या निवृत्तीनंतर रोहितची भावनिक पोस्ट?

आटपाडीत १३ लाखांचा गुटखा जप्त?