सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे, असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. (Chandrakant Patil) तसेच विशाल पाटील आणि चंद्रकांत पाटील यांची भेट झाली असल्याचा दावा देखील त्यांनी यावेळी केला.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंगचं राजकारण सुरू आहे, असा आरोप माजी खासदार संजय काका पाटलांकडून करण्यात आला आहे. खासदार विशाल पाटील आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात भेट होऊन चर्चा झाल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना आपण देखील भेटल्याचं संजयकाका पाटलांनी यावेळी स्पष्ट केल आहे. दरम्यान संजय काका पाटलांकडून चंद्रकांत पाटील आणि विशाल पाटील यांची भेट झाल्याचा दावा करण्यात आला आहे, (Chandrakant Patil) त्यामुळे आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये पॅनल होणार की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत होणार,याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आलेल्या भाजपा उमेदवाराला, खासदार विशाल पाटलांनी शुभेच्छा दिल्या आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक आणि माजी संचालक राहुल महाडिक हे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते, (Chandrakant Patil) यावेळी खासदार विशाल पाटलांनी राहुल महाडिक यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या, महाडिक हे जयंत पाटलांचे कट्टर विरोधक आहेत, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुक सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाडिक बंधू हे जिल्हा बँकेत आले होते.यावेळी खासदार विशाल पाटलांनी महाडिक बंधूंची जिल्हा बँकेच्या प्रवेशद्वारावर भेट घेतली, या भेटीदरम्यान विशाल पाटलांनी राहुल महाडिकांना पुष्पगुच्छ दिला, या शुभेच्छा वाढदिवसानिमित्त देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र विशाल पाटलांच्या शुभेच्छा एक प्रकारे जयंत पाटलांच्या विरोधकांना पाठबळ म्हणून तर नाहीत ना? अशी चर्चा आता सुरू आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज जिल्हा बँकेत उमेदवारांची झुंबड उडाली. भाजपा, शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या उमेदवारांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.भाजपाकडून भाजपा आमदार सत्यजित देशमुख, जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक,माजी संचालक राहुल महाडिक,नीताताई केळकर यांच्यासह सहा जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत तर शिवसेना शिंदे पक्षाकडून अमोल बाबर यांच्यासह चौघांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत,
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?