शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी लवकरच खात्यात ₹2000 येणार, संभाव्य तारीख समोर?

शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी यासाठी केंद्र सरकार महत्त्वाच्या योजना राबवत आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आणि दैनंदिन खर्चासाठी होतो. सध्या पीएम किसान योजनेचा लाभ लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात २३ हप्ते पाठवण्यात आले आहेत. (farmers) यामध्ये वर्षाला एकूण ६ रुपये दिले जातात. हे पैसे ३ टप्प्यात दिले जातात. आता २४ व्या हप्ताबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये हप्त्याची संभाव्य तारीख समोर आली आहे.

पीएम किसानचा लाभ कधी मिळणार पीएम किसान योजनेचा लाभ घेणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांचा हप्ता दिला जातो. मागच्या म्हणजेच २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. (farmers) त्यानुसार २० ऑक्टोबरला मागच्या हप्त्याला चार महिने पूर्ण होतात. त्यामुळे २४ वा हप्ता २० ऑक्टोबर किंवा त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ही तारीख अधिकृतपणे ठरलेली नाही. सरकारकडून हप्त्याची तारीख साधारणपणे काही दिवस आधी जाहीर केली जाते.

२४ वा हप्ता जाहीर झाल्यानंतर काही पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ४,००० रुपये जमा होण्याची शक्यता आहे. ज्या शेतकऱ्यांचा मागचा हप्ता तांत्रिक कारणामुळे अडकला असेल आणि तो नंतर मंजूर झाला, (farmers) अशा प्रकरणांमध्ये मागच्या २,००० आणि या महिन्याचे २,००० रुपये जमा होऊ शकतात. मात्र, प्रत्येक शेतकऱ्याला ४००० रुपये मिळतील असं नाही. लाभार्थ्याची पात्रता आणि मागच्या हप्त्याची स्थिती यावर रक्कम अवलंबून असेल.

हेही वाचा : 

बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?

MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?

 केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?