सरकारी कर्मचार्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. दसरा आणि दिवाळीच्या सणांपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्ता अर्थात DA आणि महागाई राहत (DR) वाढीची घोषणा लवकर करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून करण्यात आली आहे. (employees) यासोबतच दसऱ्याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना २१,००० रुपयांपर्यंतचा बोनस देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉइज अँड वर्कर्स’ने २४ सप्टेंबर २०२६ रोजी वित्त मंत्रालयाच्या व्यय विभागाला पत्र पाठवलं आहे. DA वाढ ही कोणतीही आगाऊ किंवा अतिरिक्त मागणी नसून, जुलै २०२६ पासून देय असलेला लाभ वेळेत जाहीर करावा, (employees) अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. CPI-IW चे संबंधित आकडे उपलब्ध असल्याने प्रोसेस लवकर पूर्ण करून कर्मचाऱ्यांना वाढील DA थकीत रकमेचा लाभ द्यावा, अशी मागणी आहे.
जुलै २०२६ चा AICPI-IW निर्देशांक १५३.२ अंकांवर असल्याचं सांगण्यात आलं आहे. या आकडेवारीच्या आधारे DA मध्ये ४ टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशी वाढ झाल्यावर सध्याचा ६० टक्के DA ६४ टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो. मात्र, अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या अधिकृत घोषणेनंतरच स्पष्ट होईल. DA वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी आणि जुलैमध्ये सुधारित केला जातो. कर्मचारी संघटनांच्या म्हणण्यांनुसार, जुलैची वाढ वेळेत जाहीर झाल्यावर वाढीव DA आणि मागच्या महिन्यांचा एरियर ऑक्टोबरच्या पगारात मिळण्याची शक्यता आहे. (employees) दरम्यान, कर्मचारी संघटनांनी दसरा-दिवाळीआधी २१,००० पर्यंतचा सुधारित बोनस देण्याची मागमी केली आहे. सणासुदीच्या काळात शिक्षण, घरखर्च आणि इतर आर्थिक जबाबदाऱ्या वाढत असल्याने DA आणि बोनसचा निर्णय लवकर घेण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, DA ६४ टक्के होणे, बोनसची रक्कम आणि ऑक्टोबरच्या पगारात वाढीव DA मिळणे याबाबत अद्याप अंतिम सरकारी घोषणा झालेली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी अधिकृत आदेशाची प्रतीक्षा करणं महत्त्वाचं आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?