एसआयआरच्या मुद्द्यावरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना कॉकरोच जनता पार्टीने आता निवडणूक आयोगाविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. ज्ञानेश कुमार यांनी शनिवारपर्यंत राजीनामा द्यावा, अन्यथा २ ऑक्टोबरपासून देशभर आंदोलन सुरू करू, (Election) असा इशारा सीजेपीकडून देण्यात आला आहे.

या आंदोलनाची सुरुवात मुंबईतून करण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी दिली. सीजेपीने ज्ञानेश कुमार यांना राजीनामा देण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली आहे. (Election) अशातच आता पक्षाच्या सोशल मीडिया पोस्टमधूनही कार्यकर्ते आणि समर्थकांना २ ऑक्टोबरच्या आंदोलनासाठी तयार राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, निवडणूक आयुक्त सुखबीर सिंह संधू आणि विवेक जोशी यांनी मागील दहा महिन्यांत आयोगाच्या काही निर्णयांवर अनेकदा आक्षेप नोंदवले आहेत. मतदार यादीतील नावांची भर, वगळणे आणि निवडणूक प्रक्रियेशी संबंधित काही निर्णयांवर दोन्ही आयुक्तांनी प्रश्न उपस्थित केल्याचे या वृत्तात म्हटले आहे. मात्र, निवडणूक आयोगाने हे वृत्त फेटाळून लावले असून आयोगाचे निर्णय तिन्ही आयुक्तांच्या मंजुरीनेच झाल्याचे स्पष्ट केले आहे.
एसआयआरनंतर ३० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रारूप मतदार याद्यांमधून १३ कोटींपेक्षा जास्त नावे कमी करण्यात आली आहेत. मात्र, ही नावे अंतिम मतदार यादीतून कायमची वगळण्यात आलेली नसल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, सीजेपीने याविरोधात आता ‘इलेक्शन कमिशन ठीक करो’ अभियान सुरू केले आहे. एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवावी, तोपर्यंत जानेवारी २०२५ची मतदार यादी पुनर्स्थापित करावी आणि मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया पारदर्शक असल्याचे सिद्ध करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. (Election) तसेच, एसआयआरदरम्यान घेतलेल्या निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीशी संबंधित २०२३चा कायदा रद्द करून अधिक पारदर्शक व्यवस्था तयार करावी, अशी मागणीही सीजेपीने केली आहे.
हेही वाचा :
सप्टेंबर महिना संपत आला, ऑगस्टचा हफ्ता कधी जमा होणार? लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची अपडेट?
सरकारला सदबुद्धी देवो शरद पवारांचा शनिवारी मोर्चा दुष्काळ दौऱ्यापूर्वीच सरकारला घेरणार?
बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी सलग 3 दिवस बँका बंद, कामं आधीच उरकून घ्या?