पट्टणकोडोली यात्रेचे मानकरी फरांडे बाबा यांचे निधन, १०२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; ७४ वर्षांची भाकणुकीची परंपरा

श्री क्षेत्र विठ्ठल बिरदेव पट्टणकोडोली येथील यात्रेचे मुख्य मानकरी (master)आणि ‘फरांडे बाबा’ नावाने परिचित असलेले विश्वनाथ नारायण वाघमोडे वय १०२ यांचे आज दुपारी १ वाजून १८ मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुले, चार मुली, सुना, जावई, दोन बहिणी आणि नातवंडे असा १५० हून अधिक सदस्यांचा परिवार आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच महाराष्ट्रासह विविध राज्यांतील हजारो भक्तांनी अंत्यदर्शनासाठी आणि अंत्यविधीसाठी अंजनगाव खे. येथे गर्दी केली.

फरांडे बाबा यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९२४ रोजी अंजनगाव खे. येथील मेंढपाळ कुटुंबात झाला. (master)वडील नारायण महादूबुवा व आई लक्ष्मीबाई यांच्या पोटी जन्मलेल्या बाबांनी वडिलोपार्जित परंपरेनुसार १९५२ पासून अंजनगाव खे. ते पट्टणकोडोली अशी महिनाभराची पायी वारी सुरू ठेवली होती. पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव देवस्थानच्या यात्रेत भाकणूक करण्याचा मुख्य मान अंजनगाव खे. येथील खेलोबा देवस्थानच्या गादीवरील पुजाऱ्याकडे आहे. मुख्य मानकरी आणि भाकणूक सांगणारे म्हणून त्यांची ख्याती होती. पंचक्रोशीतील सामाजिक आणि कौटुंबिक प्रश्नांवर बाबांचा शब्द अंतिम मानला जात असे.

आदमापूर येथील संत बाळूमामा दरवर्षी पट्टणकोडोली यात्रेसाठी (master)पायी वारी करून महाप्रसादाची पंगत घालत असत. या पंगतीत ते फरांडे बाबांसोबत बसून भोजन करत. बाबांनी वयाच्या २५ व्या वर्षांपासून घरात दिवाळीचे पहिले स्नान केले नाही. पट्टणकोडोलीहून पायी परतताना वाटेत दिवाळी येत असल्याने त्यांचे पहिले स्नान दरवर्षी पंढरपूर येथील चंद्रभागा नदीत होत असे. वाढत्या वयामुळे फरांडे बाबांना भाकणूक करणे शक्य होत नसल्याने सध्या हा मान त्यांचे नातू खेलुदेव ऊर्फ नानादेव वाघमोडे फरांडे महाराज यांच्याकडे आहे.आदमापूर येथील संत बाळूमामा दरवर्षी पट्टणकोडोली यात्रेसाठी पायी वारी करून महाप्रसादाची पंगत घालत असत. या पंगतीत ते स्वतः फरांडे बाबांसोबत बसून भोजन करत असत.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या