ठाकरे गटही डिलिमिटेशनला पाठिंबा देणार

लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेच्या म्हणजेच डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून (delimitation) देशातील राजकारण तापलंय. या विधेयकावरून इंडिया आघाडीत फूट पडल्याचं दिसतंय. शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीनं आधीच डिलिमिटेशनला पाठिंबा देणार असल्याचं म्हटलंय. त्यावरून इंडिया आघाडीचे नेत्याकडून शरद पवार गटावर टीका केली जातेय. परंतु आता हाती आलेल्या माहितीनुसार इंडिया आघाडीला आखणी एक धक्का मिळण्याची शक्यता आहे. कारण लोकसभेत मांडण्यात येणाऱ्या डिलिमिटेशन विधेयकाला ठाकरे गटही पाठिंबा देऊ शकतो असा दावा भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी केलाय.राजकारणात कधीही काहीही घडू शकतं. डिलिमिटेशनबाबतचे विचार पटले, तर ठाकरेंची शिवसेना पाठिंबा देऊ शकते. मात्र, आजच याबाबत काही सांगता येणार नाही, असं सूचक विधान महाजन यांनी केलंय. डिलिमिटेशन झालं पाहिजे, ही सर्वांची मागणी असल्याचं गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलंय.

खासदारांची संख्या वाढली पाहिजे, असं सांगताना सध्याच्या संख्याबळामुळे खासदारांना (delimitation) प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणं शक्य होत नाही, त्यामुळे हे विधेयक पारित झालं पाहिजे, असंही महाजन म्हणालेत.डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून बोलताना गिरीश महाजन यांनी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवरही टीका केली. काँग्रेस आता एकाकी पडलीय, तर ठाकरे गट काँग्रेसच्या मागे फरफटत जातेय, अशा टीकाही त्यांनी केली. काँग्रेसची आयडियॉलॉजी संपली असून ते तोंडात येईल ते बोलतात. डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर विरोधकांची भूमिका काय आहे, यावरूनही महाजन यांनी प्रश्न उपस्थित केले.

यावेळी भाजप नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय (delimitation) राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. संजय राऊत यांच्यावर न बोललेलं बरं, असं म्हणत त्यांनी निशाणा साधला. शरद पवार गटातील खासदारांनी पाठिंबा दिल्यानंतर संजय राऊतांनी शरद पवार गटावर टीका केली होती. यापुढे शरद पवार गटाच्या विरोधात निवडणूक लढवू. एकालाही विजयी होऊ देणार नाही, असा दावा केला.त्यावर बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत यांची बरोबरी होऊ शकत नाही, असं महाजन म्हणाले. आमदार, खासदार आणि नगरसेवक पक्ष सोडून गेलेत. उल्लेख करत त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये ताकद दाखवून द्या, असं आव्हानही त्यांनी दिलं. संजय राऊत यांच्या भाषेबाबत टीका करताना ते शेलक्या भाषेत बोलतात, असं महाजन म्हणाले. त्यांनी उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना आवरण्याचा सल्लाही दिला. संजय राऊत यांच्या विधानांमुळे शिवसेना संपविण्यासारखी परिस्थिती निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या