“शरद पवार यांची भूमिका नेहमीच अविश्वासाची” राजू शेट्टी यांचे टीकास्त्र

कोल्हापूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवार यांची भूमिका नेहमीच अविश्वासाची राहिली असून, (Kolhapur) त्यामुळे त्यांच्यावर आजपर्यंत कोणी विश्वास ठेवलेला नाही, अशी टिप्पणी शेट्टी यांनी केली. ज्या काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसचे केवळ १० आमदार असतानाही शरद पवार यांना राज्यसभेवर पाठवले, त्या काँग्रेसला अशा परिस्थितीत एकाकी पाडणे योग्य नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शनिवारी बोलताना राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्या राजकीय भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. काँग्रेसने कठीण परिस्थितीत शरद पवार यांना साथ दिली होती. (Kolhapur) त्यामुळे राजकीय परिस्थिती बदलल्यानंतर काँग्रेसला एकटे पाडण्याची भूमिका घेणे अपेक्षित नव्हते, असे मत त्यांनी व्यक्त केले.शेट्टी यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. शरद पवार आणि काँग्रेस यांच्यातील राजकीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी केलेली ही टीका महत्त्वाची मानली जात आहे.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या