कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात उभे – हसन मुश्रीफ?

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह पूर्वीपेक्षाही अधिक दिमाखदार स्वरूपात उभारण्यात आले आहे. रंगकर्मींच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत या नाट्यगृहाचा पुन्हा पडदा उघडला जावून हे नाट्यगृह पूर्वीप्रमाणेच रंगकर्मींच्या सेवेत दाखल होईल, (Kolhapur) असे मत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाची दिमाखदार पुनर्निर्मिती करण्यात आली आहे. (Kolhapur) याचे उद्घाटन रविवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्यासह लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री हसन मुश्रीफ यांनी संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. मिरजकर, आदिल फरास उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ऑगस्ट २०२४ मध्ये दुर्दैवाने आग लागून ते आगीच्या भक्षस्थानी पडले. संपूर्ण कला जगताच्या आणि जिल्हावासीयांच्या हृदयाला चटका लावणारी ही घटना होती.

त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सध्याचे मुख्यमंत्री आणि त्यावेळचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्वर्गीय अजित पवार यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. आणि त्याच दिवशी त्यांनी घोषणा केली संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाचे पूर्वस्थितीसारखेच वैभव निर्माण केले जाईल.ते पुढे म्हणाले की, नाट्यगृहाच्या उद्घाटनानंतर प्रायव्हेट हायस्कूल मैदानावर कोल्हापूर महानगरपालिकेच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आणि जाहीर सभा होणार आहे. (Kolhapur) तसेच कागल येथे हिंदूराव घाटगे विद्यालयाच्या शताब्दी वर्षानिमित्त करण्यात आलेल्या जीर्णोद्धार कामांचे उद्घाटन आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या भव्य पुतळ्याचे लोकार्पणही याच दिवशी होणार आहे.

हेही वाचा :

इचलकरंजीतही धावणार पंतप्रधान ई-बस १० बसेस लवकरच दाखल, यंत्रणा उभारणी गतीने?

सांगली बलात्कार व लूटप्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी?

 शिराळ्यात पिसाळलेल्या कुत्र्याचा सहाजणांना चावा?