कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट महापौरपदाच्या कालावधीबाबत महाडिकांचा मोठा खुलासा

कोल्हापूर महापौरपदाचा कालावधी सव्वा वर्षाचाच आहे. मुख्यमंत्र्यांनीच हे प्रथम स्पष्ट केले असल्याची माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी ‘सकाळ’ला दिली. थेट मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीतील चर्चेत उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासोबत खासदार महाडिक उपस्थित होते. (Kolhapur) त्यामुळे महाडिक यांनीच ही स्पष्टता केल्याने कालावधीच्या विषयावर पडदा पडल्यात जमा आहे.

काही दिवसांपासून महापौरपदाच्या कालावधीची चर्चा पटलावर आणण्यात आली होती. महायुती म्हणून सत्तेवर आल्यावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्यशक्ती पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी दहा महिन्यांचा कालावधी ठरवला असल्याचे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्र्यांना भेटून येथील स्थिती वेगळी असल्याबाबत पटवून देणार असल्याचा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला होता. (Kolhapur) त्यामुळे सहा डिसेंबरला दहा महिने पूर्ण होणार असल्याने पुढील टर्मसाठी शिवसेनेमध्ये हालचाली वेगावल्या होत्या. इच्छुकांकडून फिल्डिंग लावल्या जाऊ लागल्या.

दरम्यान, महापौर रूपाराणी निकम यांनी मुख्यमंत्र्यांनी सव्वा वर्षाचा शब्द दिल्याचे सांगत महायुती शब्द पाळणारी आहे, असे विधान केले. त्यानंतर मुंबईत थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यानंतरही सव्वा वर्षाचा कालावधी निश्‍चित असल्याचे सांगितले होते. महापौरपदाचा कालावधी दहा महिने, वर्ष की, सव्वा वर्षाचा हे स्पष्ट झाल्यानंतर राजीनामा द्यावा लागणार होता. त्यामुळे कोण दहा महिने, कोणी वर्षाचा, तर कोण सव्वा वर्षाचा कालावधी ठरल्याचे सांगत चर्चा करत होते.

याबाबत मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी मंत्री पाटील व खासदार महाडिक उपस्थित होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी कालावधीबाबत नेमके काय सांगितले याबाबत थेट खासदार महाडिक यांनाच आज विचारण्यात आले. यावर खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘महापौरपदाच्या कालावधीबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट होती. पदाचे तुकडे पाडण्याला त्यांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांनी सव्वा वर्षाचा महापौरपदाचा कालावधी असेल हे आम्हाला सांगितले.’ वर्षाच्या कालावधीबाबत खासदार महाडिक म्हणाले, ‘यानुसार अडीच वर्षांच्या आरक्षण काळातील सहा महिन्यांचा कालावधी कुणाला द्यायचा हा मोठा प्रश्‍न निर्माण होणार आहे. (Kolhapur) त्यामुळे वर्षाचा कालावधीचा विचार झाला नव्हता.’ यामुळे महापौर निकम यांचा कार्यकाल मार्चपर्यंत राहणार आहे. तोपर्यंत त्यांचा राजीनामा होणार नाही, असे स्पष्ट झाले.

मुख्यमंत्री अडीच वर्षांवरच होते ठाम खासदार महाडिक म्हणाले, ‘महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्यानंतर चर्चेवेळी मुख्यमंत्री महापौरपदाच्या कालावधीच्या खांडोळीच्या विरोधात होते. आरक्षणानुसार महापौर पूर्ण अडीच वर्षांचाच असला पाहिजे, असे त्यांचे ठाम मत होते. पण, स्थानिक पातळीवरील चर्चेच्या अनुषंगाने सव्वा वर्षाचा कालावधी त्यांनी निश्‍चित केला. तसेच हे केवळ कोल्हापूरपुरते नसून इतर महापालिकांसाठीही होते.

हेही वाचा : 

शेतकऱ्यांसाठी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा, 20 लाख

जळगाव जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता गडद

जुगारात हरला कर्जबाजारी झाला अन् दुचाकी चोरल्या