तपभराहून अधिक काळ प्रतीक्षा केल्यानंतर कृष्णाकाठच्या कुरुंदवाड शहराच्या पाणीपुरवठा योजनेचा अखेर मार्ग मोकळा झाला आहे. राज्य शासनाने ४९ कोटी रुपयांची प्रशासकीय मंजुरी दिली आहे. ही माहिती आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी दिली. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पाणीटंचाई आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या कुरुंदवाडकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

यासंदर्भात मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील-यड्रावकर, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, नगरसेवक अक्षय आलासे, जय कडाळे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. कुरुंदवाड शहराची जुनी पाणीपुरवठा योजना मागील १२ वर्षांपासून रखडलेली होती. संबंधित ठेकेदाराने केवळ १५ टक्के काम पूर्ण केल्याने योजना अक्षरशः ठप्प झाली होती. (Kurundwad) परिणामी शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावे लागत होते. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुकीदरम्यान नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचे आश्वासन दिले होते.
या आश्वासनाची पूर्तता करत केली आहे. सन २०४८ सालची लोकसंख्या गृहीत धरून नवीन ४९ कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. (Kurundwad) यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणर आहे. योजनेला मंजुरी मिळाल्याची बातमी शहरात पोहोचताच नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. अनेक नागरिकांनी आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याबद्दल समाधान व्यक्त केले.या योजनेमुळे कुरुंदवाड शहराला भविष्यात शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होणार असून, शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दीर्घकाळ प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने कुरुंदवाडकरांच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरत आहे.
दरम्यान, कुरुंदवाड शहरात पाणीपुरवठ्याच्या ढिसाळ आणि भोंगळ कारभाराविरोधात एका सामाजिक कार्यकर्त्यांने मंगळवारी केलेले अनोखे आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. शहरात जुन्या बस स्थानक परिसरातील मुख्य बसवेश्वर चौकात पाणीपुरवठ्याच्या वॉल्वला गळती लागल्यामुळे लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. वारंवार वॉल्व गळती होत (Kurundwad) असल्यामुळे नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पालिकेच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते आयुब पट्टेकर यांनी गळती झालेल्या पाण्याच्या खड्ड्यात उतरून अनोखे आंदोलन केले. आणि गळतीमुळे साठलेल्या खड्ड्यात आंघोळ करून प्रशासनाचा निषेध केला. पट्टेकर यांनी वारंवार गळतीस कारणीभूत निकृष्ट साहित्य पुरवठा करणाऱ्यांची व संबंधितांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
हेही वाचा :
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर शरद पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया म्हणाले?
बदली, मानधनी १,१९८ कर्मचाऱ्यांच्या कायम सेवेचा निर्णय लांबणीवर?