महिन्याचा शेवट गोड, सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमसाठी फक्त आता आजचा भाव किती?

सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी महिन्याच्या अखेरीस काहीसा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. ३१ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत कमोडिटी बाजारातही सोने आणि चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली. (gold and silver) त्यामुळे सणासुदीच्या काळात दागिने खरेदी करण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांच्या नजरा आता सोन्या-चांदीच्या दराकडे लागल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कॉमेक्सवर सोन्याच्या किमतीत सुमारे १.१५ टक्क्यांची घसरण झाली असून सोन्याचा दर प्रति औंस ४,४७७.८० डॉलरवर आला. (gold and silver) त्याचवेळी चांदीच्या दरातही १.७१ टक्क्यांची घट झाली असून चांदी प्रति औंस ६५.८५० डॉलरवर व्यवहार करत होती.देशांतर्गत मल्टी कमोडिटी एक्सचेंज म्हणजेच एमसीएक्सवरही सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. सकाळी सुमारे ९ वाजता सोन्याच्या दरात १,८८७ रुपयांची घट झाली आणि १० ग्रॅम सोन्याचा भाव १,५४,३९४ रुपयांवर पोहोचला. चांदीच्या दरात तब्बल ३,३९४ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली असून चांदीचा भाव प्रति किलो २,३९,०५० रुपयांवर आला.

भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे १,५४,३९४ रुपये, तर २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४१,८३६ रुपयांच्या आसपास आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी सुमारे १,१६,०४८ रुपये असल्याचे दिसून येत आहे. चांदीचा दरही घसरून प्रति किलो सुमारे २,३९,०५० रुपयांवर आला आहे.महिन्याच्या शेवटी सोन्या-चांदीच्या दरात झालेली ही घसरण आगामी सणासुदीच्या खरेदीसाठी महत्त्वाची ठरू शकते. मात्र, सराफा बाजारातील प्रत्यक्ष दर (gold and silver) शहरानुसार तसेच मेकिंग चार्ज, जीएसटी आणि इतर शुल्कांमुळे वेगळे असू शकतात.

हेही वाचा :

CNG दर वाढल्याने ऑटोचालकांचा ९ सप्टेंबरला संपाचा इशारा, केली मोठी मागणी?

राजकारणात खळबळ बडा नेता देणार राजीनामा तारीखही केली जाहीर?

एअरपोर्टवर अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेट १० मिनिटांच्या चर्चेने राजकीय चर्चांना उधाण?