भारत-पाकिस्तानमधीलतणावाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सोन्याचे दर प्रचंड वाढले आहेत.(Operation Sindoor)ऑपरेशन सिंदूर’नंतर गुंतवणूकदारांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने सोन्याकडे वळल्याने किंमतींमध्ये मोठी उसळी पाहायला मिळाली. दिल्लीसारख्या प्रमुख शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 99.9 टक्के शुद्ध सोन्याचा दर 1,00,770 रुपयांवर पोहोचला आहे. याआधीही 23 एप्रिल रोजी, पहलगाम हल्ल्यानंतर सोन्याचे दर एक लाख पार गेले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर तेच चित्र पाहायला मिळत आहे. गुंतवणूकदार जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर सोन्यात गुंतवणूक करत असल्याने मागणी वाढली आहे.

इंडियन बुलियन असोसिएशनच्या माहितीनुसार, मंगळवारी 99,750 रुपयांवर असलेले दर बुधवारी 1,000 रुपयांनी वाढून 1,00,770 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. याशिवाय, 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा दर 1,00,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर विकला गेला. 22 एप्रिल रोजीही 1800 रुपयांची मोठी उसळी नोंदली गेली होती.(Operation Sindoor)या घडामोडींमुळे भारतातील सराफा बाजारात प्रचंड हालचाल पाहायला मिळत आहे. दिल्ली, मुंबईसारख्या प्रमुख शहरांमध्ये खरेदीदारांचा ओघ वाढला आहे. अक्षय्य तृतीयेनंतरही मागणी कायम असल्याने दरात वाढ होत आहे.
भारतामध्ये सोन्याच्या दरात वाढ झाली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र किंमती स्थिर आहेत किंवा किंचित घटल्या आहेत. यामागे अमेरिका-चीन व्यापारी तणावात आलेली शिथिलता हे एक महत्त्वाचं कारण आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत स्थैर्य आहे. (Operation Sindoor)सद्याच्या घडामोडी पाहता, भारतात पुढील काही दिवसांतही सोन्याच्या किंमती उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळणे हेच या दरवाढीमागील मुख्य कारण आहे.
हेही वाचा :
“हम पीछे हटने को तैयार हैं…”, ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान हादरला
आज ‘या’ 3 राशींवर असणार बुधादित्य योगाची कृपा; सुवर्णकाळ लवकरच होणार सुरु
हसत-खेळत वजन होईल कमी, डाएटचीही गरज नाही; फक्त ‘या’ टिप्स फॉलो करा