पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’च्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधला. (Narendra Modi) कार्यक्रमाच्या १३८व्या भागात त्यांनी सर्जिकल स्ट्राइक, दहशतवाद, जनगणना आणि विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

सर्जिकल स्ट्राइकचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, २८ सप्टेंबरला या कारवाईला १० वर्षे पूर्ण होत आहेत. २८ आणि २९ सप्टेंबर २०१६ रोजी भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात सीमेपलीकडे जाऊन केलेल्या कारवाईने जगाचं लक्ष वेधून घेतलं होतं. सर्जिकल स्ट्राइकच्या माध्यमातून भारताने दहशतवादाविरोधातील आपली भूमिका जगासमोर ठामपणे मांडली, असं त्यांनी सांगितलं. (Narendra Modi) यावेळी बोलताना त्यांनी बालाकोट एअर स्ट्राइकपासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंतच्या कारवायांचाही उल्लेख केला. भारताने दहशतवादाविरोधात आपली भूमिका सातत्याने स्पष्ट केली असून, आजचा भारत दहशतवाद सहन करू शकत नाही, असं मोदी म्हणाले. दहशतवादाविरोधात देशाने ‘झिरो टॉलरन्स’चं धोरण स्वीकारलं असून, त्याचे परिणामही दिसून येत असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मोदींनी आपल्या संबोधनात जनगणनेचाही उल्लेख केला. देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये जनगणनेचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण झाला असून, आतापर्यंत ३२ कोटींपेक्षा जास्त कुटुंबांची माहिती नोंदवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील माणा गावातून जनगणनेला सुरुवात झाली. जनगणना ही प्रत्येकाची राष्ट्रीय जबाबदारी असून, नागरिकांनी त्यासाठी वेळ द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. (Narendra Modi) दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे माजी आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष दिवंगत अशोक सिंघल यांचाही मोदींनी उल्लेख केला. सिंघल यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बोलताना त्यांनी संस्कृती, समाज आणि राष्ट्रासाठी सिंघल यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केल्याचं सांगितलं. रामजन्मभूमी आंदोलनाला त्यांनी दिशा आणि ऊर्जा दिली आणि त्याचाच परिणाम म्हणून आज अयोध्येत भव्य मंदिर पाहायला मिळत असल्याचं पंतप्रधान मोदींनी नमूद केलं.
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?