सांगली मनोज जरांगे यांच्या ताफ्यातील 2-3 वाहनांचा अपघात, भरगर्दीत?

सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ हा अपघात झाला आहे. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कार्यकर्त्याला जरांगे स्वत: रुग्णालयात घेऊन गेले आहेत.

आज पश्चिम महाराष्ट्र दौऱ्याचा समारोप करत असताना सांगली जिल्ह्यातील विटा येथे मनोज जरांगे यांचे भव्य दिव्य पद्धतीने स्वागत करण्यात आले. या स्वागतासाठी ढोल ताशा झांज पथक आणि 30 जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करून त्यांचा सन्मान आणि स्वागत करण्यात आले. दरम्यान, प्रचंड गर्दी झाल्यामुळे जरांगे पाटील यांच्या ताफ्यातील दोन ते तीन गाड्या बसल्या धडकल्या. या धडकेत एका कार्यकर्त्याला किरकोळ दुखापत झाली. (accident) त्यामुळे सुदैवाने संकट टळलं असे कार्यकर्ते बोलताना दिसत आहेत.सांगलीतील विटा शहराकडे येत असताना आंबेगाव जवळ जरांगे यांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी झाली. त्यामुळे वाहनांना बसचा धक्का लागला आणि हा अपघात घडला. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या कार्यकर्त्याला मनोज जरांगे पाटील यांनी स्वत: रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. आता अपघातामध्ये जखमी झालेल्या सहकार्याला खाजगी रुग्णालयामध्ये हलवलं जात असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. सांगली येथे जात असताना त्यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. (accident) त्यापूर्वी येथे माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सरकार उपसमितीची किती बैठक घेणार अजून, समाजाला काय देताय तुम्ही. मराठा बांधवांनी आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या कुटुंबासाठी ऊर्जा खात्याचा साधा एक जीआर काढता आला नाही सरकारला, काय नाक उचलून फडणवीस बोलणार आहेत. दरवेळी छत्रपतींचे नाव घेताय. जी चूक केली त्याबदल बोला, लोकाचा रोष कमी होईल, प्रमाणपत्र द्या पुन्हा. सरकारचा तिरस्कार येतोय आता, तो वाढू देऊ नका, शेतकरी मुस्लिम, ओबीसी मध्ये तिरस्कार. सरकारने मराठा वर्गाला प्रचंड हिणवले आहे. 3 वर्षात किती मोर्चे झाले आणि 3 वर्षात काय दिले. मराठा समाजाचा पुन्हा मुंबईला जाण्याचा देखील विचार आहे.पुढे ते म्हणाले की, मला अनेक मराठा नेत्यांचे फोन येतात. आमदारर, खासदार फोन करून तुम्ही म्हणताय ते पटते असे सांगतात, राणे सारखे अनेक मराठा नेते आता बोलू लागला आहे, (accident) याचे स्वागत आहे. सरकारचा माज उतरला जातोय. वडेट्टीवार यांना माझ्यावर बोलायला राहुल गांधीनी हे सांगितले आहे का तुम्हाला? बोटावर मोजण्याइतके काँग्रेस राहिली आहे ती ही संपवू नका.

हेही वाचा :

कोल्हापुरात लिंगायत समाजाचा एल्गार?

नागरिकांनो सावधान पेट्रोल भरताना झिरोसोबत दोन गोष्टी तपासा?

सर्वसामान्यांना झटका साखरेचे दर टक्क्यांनी वाढले?