राज्यात सध्या भीषण दुष्काळ पडला आहे. शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. शेतकऱ्यांना आग्रीम मदत म्हणून सरकारने पाच हजार रुपयांची घोषणा केली आहे. (farmers) दरम्यान त्यानंतर आता आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.

यंदा एल निनोने मान्सूनचा खेळ बिघडवला, जुनचा शेवटचा आठवडा आणि संपूर्ण जुलै महिना चांगला पाऊस झाला, मात्र त्यानंतर एल निनोचं सावट अधिक गडद होत गेलं आणि पाऊसच झाला नाही, संपूर्ण पावसाळा कोरडला गेला. ऑगस्ट, सप्टेंबर अन् ऑक्टोबर महिन्यात पावसाने दडी मारली. पाऊस न झाल्यामुळे खरीप हंगाम तर हातचा गेला, मात्र रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीला देखील पुरेसा पाऊस न झाल्याने शेतकरी अजूनच संकटात सापडले. यंदा शेतीत उत्पन्नच न निघाल्याने आता जगायचं कसं? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अन्न-धान्य टंचाईसोबतच जनावरांच्या चाऱ्याची देखील भीषण टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे बळीराजा हातबल झाला आहे. (farmers) दरम्यान निराश झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी काही दिवसांपूर्वीच सरकारने आग्रीम मदत म्हणून पाच हजार रुपयांची घोषणा केली होती. राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होण्यास सुरूवात झाली आहे. या पैशांमुळे थोडा का होत नाही, शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान त्यानंतर आता राज्य सरकारच्या वतीने आणखी एक मोठी घोषणा करण्यात आली आहे.
मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत 116 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. रोजगार हमी योजनेंतर्गत या निधीचं वितरण करण्यात आलं आहे. या निधीमुळे रखडलेल्या शेत पाणंद रस्त्यांच्या कामांना आता गती मिळणार आहे. शेतापर्यंत बारमाही रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. या कामांमुळे दुष्काळात शेतकऱ्यांना, शेतमजूंना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यांच्या हाताला स्थानिक पातळीवच काम मिळणार आहे. (farmers) त्यामुळे काही अंशी दुष्काळामुळे होणाऱ्या स्थलांतराला देखील अळा बसू शकतो. कुशल अनुदानाअभावी रखडलेल्या कामांना 116 कोटींच्या निधीमुळे चालना मिळणार आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची कामे वेळेत पूर्ण करण्यावर सरकारचा भर आहे, अशी माहिती यावेळी मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. दरम्यान या कामांमुळे स्थानिक पातळीवर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती होण्यास मदत होणार आहे.
हेही वाचा :
मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय