नशेसाठी वापरली जाणारी ८४ इंजेक्शन्स जप्त?

सांगली तरुणांमध्ये नशेसाठी आणि बॉडीबिल्डिंगसाठी बेकायदेशीररीत्या वापरल्या (Crime) जाणाऱ्या ‘मेफेनटरमाईन सल्फेट’ या प्रतिबंधित औषध द्रव्याच्या साठ्यावर सांगली जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी छापा टाकला.

या कारवाईत ८४ इंजेक्शन्सच्या बाटल्या आणि मोबाईल असा एकूण ५६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. (Crime) याप्रकरणी राहुल सहदेव अडगळे (वय २३, रा. जोतिबा मंदिरामागे, समडोळी रोड, सांगलीवाडी, ता. मिरज) या संशयिताला अटक केली आहे. त्याच्याविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

जिल्ह्यात नशेचे पदार्थ आणि उत्तेजक औषधांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तुषार दोशी व अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारावकर यांनी दिले आहेत. यानुसार, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक सांगलीवाडी परिसरात गस्तीवर होते. (Crime) त्यावेळी ‘फल्ले मंगल कार्यालय’ आणि सांगलीवाडी टोलनाका परिसरामध्ये एक तरुण बेकायदेशीररीत्या ‘मेफेनटरमाईन’ इंजेक्शन्सची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने या ठिकाणी सापळा रचून संशयास्पद हालचाली करणाऱ्या राहुलला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, कापडी पिशवीत इंजेक्शन्स आढळून आली.

हेही वाचा :

इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?

1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?

फोनपे वापरण्यासाठी मोठा झटका नवीन नियम लागू?