विराट कोहलीच्या नावाने व्हायरल झालेल्या पोस्टचे सत्य आले समोर?

दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली याच्या नावाने सोशल मीडियावर एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला कोहलीने पाठिंबा दिल्याचा दावा या पोस्टमधून करण्यात आला. मात्र या व्हायरल स्क्रीनशॉटची पडताळणी केल्यानंतर त्यामागील सत्य वेगळेच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज आणि अश्रुधुराचा वापर केल्यानंतर या आंदोलनाची अधिक चर्चा सुरू झाली. (Virat Kohli) त्यानंतर अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला, तर काही जण प्रत्यक्ष आंदोलनातही सहभागी झाले. अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी भूमिका घेतल्याने त्यांचे कौतुक झाले, तर शांत राहिलेल्या काही सेलिब्रिटींना सोशल मीडियावर टीकेलाही सामोरे जावे लागले.

याच दरम्यान विराट कोहलीच्या नावाने ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट मोठ्या वेगाने व्हायरल झाली. (Virat Kohli) त्या पोस्टमध्ये विद्यार्थ्यांना पारदर्शक परीक्षा प्रणाली मिळावी, त्यांच्या तक्रारी गांभीर्याने ऐकल्या जाव्यात आणि प्रशासनाने तातडीने योग्य निर्णय घ्यावा, असा मजकूर दिसत होता. स्क्रीनशॉटमध्ये विराट कोहलीचे नाव, पत्नी अनुष्का शर्मा सोबतचा प्रोफाइल फोटो आणि व्हेरिफाईड अकाऊंटसारखे चिन्ह असल्यामुळे अनेकांनी ही पोस्ट खरी असल्याचे मानले.

व्हायरल होत असलेल्या स्क्रीनशॉटची सखोल पडताळणी केल्यानंतर हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित पोस्ट ज्या अकाऊंटवरून करण्यात आली होती (Virat Kohli) त्याचा हँडल @Highonchurma असा असून तो विराट कोहलीचे अधिकृत खाते नाही. विराट कोहलीचे अधिकृत आणि व्हेरिफाईड ‘X’ अकाऊंट @imVkohli आहे. त्यामुळे सोशल मीडियावर फिरणारा स्क्रीनशॉट हा बनावट असल्याचे निश्चित झाले.

हेही वाचा :

केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?

सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?

रोहित शर्मा रिटायर होणार? टीम इंडियाच्या कोचने दिल उत्तर?