‘सीमा, तुला…’; पहलगाम हल्ल्यानंतर सीमा हैदरच्या पहिल्या नवऱ्याची थेट धमकी

पहलगाम हल्ल्यानंतर(attack) भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश देताच, सीमा हैदरचा पहिला पती गुलाम हैदर याचा एक धमकीवजा व्हिडीओ समोर आला आहे. यात त्याने सीमा, तिचा भारतीय पती सचिन मीणा आणि वकील एपी सिंह यांना लक्ष्य केले आहे.

पाकिस्तानातून जारी केलेल्या व्हिडीओमध्ये गुलाम हैदर म्हणतो, “सीमाचे पाय आता भीतीने थरथर कापत आहेत. तिला वाटत असेल मी थकलो, पण मी माझ्या चार मुलांसाठी लढत राहीन.” त्याने सचिन मीणावर अत्यंत आक्षेपार्ह टीका करत “ते काळं वांगं सचिन किती दिवस जगेल?” असा सवाल केला.

“आता निर्णयाची वेळ आली आहे. त्यांना कर्माचे फळ मिळेल. एपी सिंह सुद्धा वाचवू शकणार नाही. सीमा, तुला यावेच लागेल,” असा इशारा गुलामने दिला आहे. त्याने व्हिडिओत थेट पहलगाम हल्ल्याचा(attack) उल्लेख केला नसला तरी, सरकारच्या आदेशानंतर सीमालाही परत पाठवले जाईल, अशी आशा त्याला वाटत असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.

दुसरीकडे, सीमा हैदरचे वकील एपी सिंह यांनी गुलाम हैदरचे दावे फेटाळले आहेत. ते म्हणाले, “सीमा पहलगाम हल्ल्याने दुःखी असून सध्या रुग्णालयात आहे. तिने नेपाळमध्येच सनातन धर्म स्वीकारला होता आणि सचिनशी हिंदू रितीरिवाजांनुसार विवाह केला आहे.”

“सीमाची सर्व कागदपत्रे एटीएस, गृह मंत्रालय आणि भारत सरकारकडे जमा असून, तिची याचिका राष्ट्रपतींकडे प्रलंबित आहे. ती जामिनाच्या सर्व अटींचे पालन करत राबुपुरा येथील घरी राहत आहे. तिचा कायद्यावर विश्वास असून ती उत्तर प्रदेश सरकार आणि न्यायालयाच्या आदेशांचे पालन करत राहील,” असे एपी सिंह यांनी स्पष्ट केले. सीमाने नुकतेच सचिनपासून झालेल्या एका मुलीला जन्म दिला आहे.

हेही वाचा :

काश्मीरच्या हृदयात भारत आहे की पाकिस्तान? स्थानिक महिलेचा खुलासा; Video Viral

शरद पवार गटात भूकंप! जयंत पाटलांकडून सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या रद्द; अंतर्गत वाद उफाळला?

‘या’ बाईकचा नादच खुळा ! चक्क कंपनी देतेय कारसारखे फीचर्स