कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
केवळ विज्ञानाच्या जोरावर मानवाने चंद्र पादाक्रांत केला, मंगळावर संशोधन मोहीम राबवली, अवकाशात मानवनिर्मित उपग्रहांची गर्दी केली, माहिती आणि तंत्रज्ञानाने जगाला संकुचित केले, जग जवळ आणले, संभाव्य संकटाची चाहूल देणारी यंत्रणा विकसित केली, पण माणूस निसर्गावर मात करू शकला नाही. निसर्ग समजू शकला नाही, बुधवारी सकाळी नेपाळ, तिबेट आणि चीन या त्रिकोणात केवळ शंभर सेकंदामध्ये होत्याचे नव्हते झाले. इतका महाविनाशकारी महा भयानक प्रलय मानवाने बुधवारी पहिल्यांदाच पाहिला असेल. निसर्गाच्या प्रकोपा पुढे माणसाचा कसा पाला पाचोळा होतो याचे रौद्रदर्शन बुधवारी सकाळी झाले.

नेपाळच्या रसुवा या जिल्ह्याची सीमा चीन आणि तिबेट या दोन स्वतंत्र देशाशी संलग्न आहे. (conquered)याच जिल्ह्याच्या सीमेवर चिनचे एका भव्य वास्तूमध्ये कार्यालय आहे. येथूनच मानस सरोवराला जाणाऱ्या पर्यटकांना ग्रीन सिग्नल दिला जातो. या वास्तुसह या जिल्ह्यातील अनेक गावे अक्षरशा पालापाचोळ्यासारखी महाप्रलयात वाहून गेली.नेपाळमधील या विनाशकारी महाप्रलयाची माहिती एव्हांना साऱ्या जगाला माहित झाली आहे. तिचा पुनर्विचार करण्याची काही गरज नाही मात्र हे नैसर्गिक संकट का आले? त्याच्या मागची कारणे काय? या प्रश्नांची उत्तरे शोधता येतात.
रासायनिक खतांचा वाढलेला वापर, पशुपालनामुळे हवेत मिथेन आणि नायट्रोजन हे वायू तयार होतात, ते मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण करतात. तापमान सातत्याने वाढत चालले आहे. परिणामी हिमालयातील हिमनद्या वितळू लागलेल्या आहेत.नेपाळ आणि तिबेट या सीमा भागातील बर्फ मोठ्या प्रमाणावर वितळतो आहे, परिणामी तिबेटमध्ये भूस्खलन झाले, माती आणि बर्फाचा प्रचंड डोंगरच जसवा जिल्ह्यातील नदीमध्ये कोसळला. (conquered) त्यामुळे काही तासांसाठी नदीवर धरण निर्माण झाले आणि त्याचा फुगवटा होऊन प्रचंड प्रमाणात महा प्रलयासारखे पाणी पसरले आणि हे नैसर्गिक संकट कोसळले.मानवी हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरचे वातावरण बदलते आहे. ग्रीन हाऊस वायू हे पृथ्वीभोवती सूर्याची उष्णता साठवून ठेवतात. कोळसा, पेट्रोल आणि डिझेल जाळल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कार्बन तयार होऊन तो वातावरणात मिसळतो.
कार्बन शोषून घेणारी झाडे मोठ्या प्रमाणावर तोडण्यात आली आहेत. या सर्वांचा परिपाक पर्यावरणीय वातावरणावर होतो आणि मग अशा महा जलप्रलयाच्या घटना घडतात.मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण झाले पाहिजे. सौर आणि पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे. पेट्रोल आणि डिझेलवर चालणारी वाहने कमी झाली पाहिजेत. इलेक्ट्रॉनिक वाहनांचा वापर झाला पाहिजे. सार्वजनिक परिवहन सेवा सक्षम केली पाहिजे.माणसाने निसर्गाविरुद्धचे वर्तन बदलले पाहिजे. निसर्गाला गृहीत धरून चालणार नाही हे नेपाळच्या घटनेने स्पष्ट केले आहे. केवळ शंभर सेकंदात होत्याचे नव्हते होत असेल तर माणसाने आता सावध झाले पाहिजे. निसर्गाशी छेडछाड करण्याचे थांबवले पाहिजे. एल निनो चा प्रभाव वाढल्यामुळे यंदा काही ठिकाणी दुष्काळ पडेल तर काही ठिकाणी महापूर येईल असे अंदाज हवामान तज्ञांनी दोन महिन्यापूर्वी व्यक्त केले होते.
नेपाळच्या घटनेने हे अंदाज खरे ठरले आहेत. या महाप्रलयामध्ये जीवित हानी किती झाली याचे निश्चित आकडे अजून बाहेर आलेले नाहीत मात्र मोठ्या प्रमाणावर जीवित हानी झालेली आहे हे मात्र निश्चित. नेपाळला मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असतात. हिमालयाच्या कुशीतले हे छोटेसे राष्ट्र आहे. येथूनच चीनच्या हद्दीत असलेल्या कैलास मानस या अध्यात्मिक केंद्राला भेट देण्यासाठी हिंदू धर्मीयांची दरवर्षी गर्दी होत असते. महाराष्ट्रातून आणि देशातून हजारो पर्यटक गेल्या चार दिवसात नेपाळला गेलेले आहेत. (conquered) त्यातील बहुतांशी पर्यटक सुखरूप असले तरी महाप्रलयात वाहून गेलेल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील पर्यटकांची संख्या जास्त आहे. भारत सरकारच्या वतीने नेपाळशी संवाद साधला जातो आहे. तेथे अडकलेल्या भाविक पर्यटकांची सुटका करण्याला प्राधान्य दिले जाईल. प्रसंगी एअरलिफ्टिंग केले जाईल. काही वर्षांपूर्वी केदारनाथला असाच हाहाकार उडाला होता. शेकडो भाविक पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. एकूणच हिमालयाच्या कुशीमध्ये असलेल्या लोक वस्त्या आता धोक्यात आलेल्या आहेत. आणि त्याला प्रामुख्याचे कारण तेथील बर्फ वितळणे असे देता येईल. आणि त्यालाही ग्लोबल वार्मिंग कारण ठरत आहे.
हेही वाचा :
इचलकरंजीत राजकीय भूकंप प्रकाश आवाडेंची लोकसभा लढण्याची तयारी खासदार माने गटाची धाकधूक वाढली?
महाराष्ट्रात पाऊस कोसळणार की नाही? जाणून घ्या आजचा हवामान अंदाज?
८ ते १० तास बैठे काम करताय ? हार्टला का आहे धोका डॉक्टरांनी सांगितले?