कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायदा संपूर्ण देशामध्ये पहिल्यांदा करणाऱ्या महाराष्ट्रात या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत पण त्यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचे कोल्हापूर दुर्दैवाने आघाडीवर असल्याचे (testing) अतिशय निंदाजनक चित्र पुढे येताना दिसते आहे. आता तर जिल्हा शल्य चिकित्सक म्हणून शासकीय रुग्णालयांमध्ये काम करून निवृत्त झालेल्या एका डॉक्टरने गर्भपाताची फॅक्टरीच उघडली होती. पोलिसांनी त्याची पोलखोल केल्यानंतर कोल्हापूरच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्र हबकून गेला आहे.

वंशाला मुलगाच पाहिजे अशी मानसिकता असली तरी जन्मास आलेल्या मुलीचे स्वागत केले जात होते असा एक काळ होता. असे म्हटले जात होते की किंवा ते आजही म्हटले जाते की घराण्याची पुण्याई असल्याशिवाय त्या घरात मुलगी जन्माला येत नाही. पहिली बेटी धनाची पेटी असेही म्हटले जाते. (testing) याचा अर्थ प्रत्येक घरात मुलीच्या जन्माचे स्वागत केले जात होते. अगदी दोनच दिवसापूर्वी जन्मास आलेल्या मुलीचे रुग्णालयापासून घरापर्यंत जल्लोषी स्वागत करण्यात आल्याची घटना सर्वांना सुखावून गेली होती. अक्षरशः त्या नवजात मुलीची वाजत गाजत मिरवणूकच काढली गेली होती. असे असले तरी कोल्हापूर सारख्या पुरोगामी विचारांची राजधानी असलेल्या शहरात आणि ग्रामीण भागात गेल्या काही वर्षांपासून स्त्री भ्रूणहत्येचे प्रमाण कमाल पातळीवर वाढलेले आहे. आधी गर्भलिंग चाचणी करायची आणि त्यामध्ये गर्भाशयात स्त्रीभ्रूण असेल तर तातडीने गर्भपात करायचा अशा घटना घडताना दिसत आहेत.
डॉक्टर चंद्रकांत गुंडा गायकवाड (वय 70, राहणार कदमवाडी) हे महाशय शासकीय वैद्यकीय सेवेत होते. वैद्यकीय अधिकारी ते जिल्हाशल्य चिकित्सक असा त्यांचा वैद्यकीय क्षेत्रातील प्रवास आहे. दहा वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले आणि कदमवाडी परिसरात प्रतिमा हॉस्पिटल सुरू केले. या हॉस्पिटलमध्ये बाय हे रुग्ण विभागाबरोबरच अंतर रुग्ण विभागही होता आणि आहे. कळंबा रोडवर फार्म हाऊस सदृश्य निवासस्थानामध्ये गर्भलिंग चाचणी केंद्र अतिशय गोपनीयता राखून चालवले जात होते. पोलिसांनी तिथे ध्यान टाकली आणि त्यातून निवृत्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्यांच्या प्रतिमा हॉस्पिटल वर बनावट महिला ग्राहकाच्या माध्यमातून धाड टाकली आणि अनेक धक्कादायक गोष्टी बाहेर आल्या. (testing) गेल्या चार वर्षांपासून हे महाशय स्त्री भ्रूण हत्या अर्थात गरोदर स्त्रियांचा गर्भपात करत होते. विशेष म्हणजे त्यांनी गेल्या दोन-तीन वर्षात आईच्या गर्भाशयात असलेल्या कळ्यांची कत्तल केली. 250 गर्भपात केले असल्याची कबुलीच त्यांनी दिल्यानंतर पोलीसही चक्रावून गेले.
शासकीय वैद्यकीय सेवेत असताना या महाशयांनी गर्भलिंग निदान विरोधी भूमिका बजावली होती. या संदर्भातील कायद्याचे पालन करण्याचे आवाहन ते करत आले होते आणि केवळ पैशाच्या हव्यासापोटी त्यांनी आपल्या हॉस्पिटलमध्ये कत्तलखाना सुरू केला होता. वीस हजार रुपयांपासून चाळीस हजारापर्यंत ते गर्भपात करण्यासाठी पैसे घेत असत. त्यांना पोलिसांनी अगदी नियोजनपूर्वक गर्भपात करण्याच्या सज्जतेत असताना रंगेहात पकडले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक या पदावरून सेवानिवृत्त झालेल्या डॉक्टर चंद्रकांत गायकवाड यांना दरमहा किमान 80 हजार ते एक लाखापर्यंतची पेन्शन मिळत असावी. सेवानिवृत्तीनंतर खरे तर त्यांनी आपली वैद्यकीय सेवा सर्वसामान्य जनतेला अगदी माफक दरात उपलब्ध करून द्यायला हवी होती. कारण जगण्यासाठी म्हणून त्यांना चांगली घसाघशित पेन्शन मिळत होती किंवा मिळत आहे. एखाद्याने मिळालेले बोनस आयुष्य समाजासाठी खर्ची घातली असते. डॉक्टर तात्याराव लहाने यांचा आदर्श घ्यायला हवा होता. पण आयुष्याच्या संध्याकाळी त्यांनी गर्भपात करण्याचा उद्योग सुरू करून स्वतःचे रूपांतर पैसे देणाऱ्या यंत्रात करून टाकले होते.
पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यानंतर अर्थातच त्यांच्या छातीत दुखू लागले आणि मग त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावी लागली. अर्थात त्यांचे हे छातीत दुखणे नाटकच असण्याची शक्यता अधिक आहे.गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असला तरी हा कायदा हातात घेणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कठीण आहे. वास्तविक ती अधिक सोपी आणि सुटसुटीत असायला हवी. जो कोणी हा कायदा हातात घेईल त्याला पोलिसांनी फिर्याद घेऊन किंवा स्वतः फिर्यादी होऊन अटक करण्यात आली पाहिजे. पण ही अटकेची प्रक्रिया सहज आणि सोपी ठेवण्यात आलेली नाही. खरे तर हे या कायद्याच्या मूळ हेतूला काहीसा धक्का देणारे आहे.
सांगली जिल्ह्यातील म्हैशाळ या गावी काही वर्षांपूर्वी अशाच एका डॉक्टर महाशयांना स्त्रीभ्रूणहत्या आणि स्त्रियांचे खून केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. या घटनेवर आधारित” देव माणूस “नावा ची मालिका दूरदर्शनच्या खाजगी वाहिनीवरून प्रसारित केली गेली होती. भारतीय संस्कृतीमध्ये डॉक्टरला देव म्हटले जाते. कारण तो रुग्णावर चांगले उपचार करून त्याला जीवनदान करत असतो. (testing) अजूनही डॉक्टरांविषयी समाजात आदराचे स्थान आहे. पण गर्भपाताच्या फॅक्टरी सुरू करून अमाप धनसंचय करणारे डॉक्टर असतात आणि त्यांना कसाई म्हटले जाते. वैद्यकीय क्षेत्रातील ज्येष्ठ मंडळीनी या क्षेत्रात वाढत असलेल्या नीच प्रवृत्ती विरुद्ध आवाज उठवला पाहिजे आणि अशा डॉक्टरांची पोलखोल केली पाहिजे.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?