देशातील ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. तेल विपणन कंपन्यांनी 1 ऑगस्ट रोजी गॅसच्या किंमतीत मोठी कपात करण्याची घोषणा केली. ताज्या रेट्सनुसार, ग्राहकांना सिलेंडर 200 रुपयांनी स्वस्त मिळणार आहे. काय आहे नवीन किंमत? जाणून घ्या.

महिन्याच्या सुरुवातीलाच आनंदवार्ता धडकली. आज तेल कंपन्यांनी व्यावसायिकांना, हॉटेल, रेस्टॉरंट चालकांना मोठा दिलासा दिला. ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी 1 ऑगस्टपासून 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 200 रुपयांची कपात केली आहे. (gas cylinder) या नवीन किंमतींमुळे हॉटेल, रेस्टॉरंट, धाबे, कॅटरिंग व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व ठिकाणी व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर होतो. तर दुसरीकडे घरगुती 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
नवीन किंमतीनुसार, दिल्लीत व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 202 रुपये, कोलकत्तामध्ये 209 रुपयांनी स्वस्त झाली आहे. या दर कपातीचा मोठा दिलासा व्यावसायिकांना मिळणार आहे. तर मुंबईसह चेन्नई शहरात 200 रुपयांच्या जवळपास दिलासा मिळाला आहे. सलग दुसऱ्यांदा व्यावसायिकांना सरकारने मोठे गिफ्ट दिले आहे. इराण-अमेरिका युद्धा दरम्यान व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ झाल्याने आणि पुरवठ्यातील अनियमिततेमुळे व्यावसायिकांना मोठा फटका बसला होता. (gas cylinder) अनेक ढाबे, रेस्टॉरंट बंद करावे लागले होते. तर काहींनी चुलीची व्यवस्था केली होती.
ताज्या दरानुसार, आता दिल्लीत 19 किलो वजनी सिलेंडरची किंमत 2728 रुपये तर कोलकत्तामध्ये हा दर 2872.50 रुपये इतका झाला आहे. दिल्ली शहरात दोन महिन्यात एलपीजीची किंमत 385.50 रुपयांनी स्वस्त झाली आहे. मुंबईत सिलेंडरची किंमत आता 2691 रुपये, पटणा शहरात 3018 रुपयांना मिळणार आहे. जुलै महिन्यात तेल कंपन्यांनी 19 किलो वजन सिलेंडरच्या किंमतीत 183 रुपयांची कपात करण्यात आली होती. सलग दुसऱ्या महिन्यात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. यावेळी 19 किलो वजनी व्यावसायिक LPG सिलेंडरचा भाव घसरला आहे.
14.2 किलो वजनाच्या घरगुती LPG सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. या किंमती पूर्वीप्रमाणेच लागू आहेत. ग्राहकांना गॅस स्वस्त होण्याची आशा होती.(gas cylinder) व्यावसायिक सिलेंडरचा वापर हा हॉटेल, रेस्टॉरंट, कॅफे, कॅटरिंग सर्व्हिस, ढाबाचालक, चहा टपरी चालक करतात. त्यांना भाव घसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मागील काही महिन्यात त्यांचे आर्थिक गणित कोलमडले होते. गॅसचा अनियमित पुरवठा आणि वाढलेल्या किंमतींनी अनेक व्यावसायिक हैराण झाले होते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या दर कपातीने त्यांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा :
पोस्ट ऑफिसच्या RD योजनेत पैसे गुंतवल्यास होणार लाखोंचा नफा?