वाल्मिक कराडचं प्रकरण समोर धनंजय मुंडे तडकाफडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत काय ठरणार

फडणवीसांच्या भेटीसाठी धनंजय मुंडे सह्याद्रीवर; भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट एनसीपी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचले आहेत. (meet) त्यांनी ही भेट नेमकी का घेतली आहे. याबद्दलची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

धनंजय मुंडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सह्याद्री अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. मुख्यमंत्री फडणवीसाची भेट घेऊन त्यांच्याशी ते चर्चा करणार आहेत. (meet) पण भेटीचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे हे अतिथीगृहावर दाखल झाले आहेत. आज सकाळीच एनसीपी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी धनंजय मुंडे यांचंदेखील नाव घेतलं होतं. वाल्मिक कराड यांच्यासंदर्भाने बरेचशे आरोप त्यांनी केलेले पाहायला मिळाले होते. वाल्मिक कराडशी कार्यकर्ते तुरुंगात असूनही संपर्कात आहेत. त्यांचे संपर्क होण्यावरुन सोनावणेंनी गंभीर आरोप केले आहेत.

दरम्यान, या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी काही चर्चा होणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कारण यासंदर्भात गृहमंत्रालयाने लक्ष घालावं, राज्य सरकारने योग्य ती कारवई करावी असं आवाहन केलं होतं. दहशतीचं वातावरण कुठेही असू नये अशी भूमिका त्यांनी मांडली होती. (meet) त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे लक्ष लागंल आहे. काही खाजगी कामानिमित्त ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र नेमकी खरी माहिती अद्याप समोर आलेली नाही.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार