इचलकरंजी – इचलकरंजीतील पोलीस उपअधीक्षक डिवायएसपी(Superintendent)समीरसिंह द्वारकासिंह साळवे यांची विहित कालावधी पूर्ण झाल्यानंतर बदली करण्यात आली आहे. त्यांनी आज अधिकृतपणे आपल्या पदाचा कार्यभार नविन डिवायएसपी श्री. विक्रांत गायकवाड यांच्याकडे सोपवून कार्यमुक्ती घेतली.गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ इचलकरंजी येथे सेवा बजावलेल्या साळवे यांनी आपल्या कार्यकाळात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पार पडल्या आणि नागरिकांमध्ये पोलिसांबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला.

आपल्या निरोप संदेशात साळवे यांनी इचलकरंजीतील नागरिक, सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि सर्व सुहृदांचे मन:पूर्वक आभार मानले. “आपल्या सारख्या सहृदय (Superintendent)आणि सहकार्य देणाऱ्या लोकांमुळे काम करताना खूप आनंद मिळाला. आपल्या सर्वांना उत्तम आरोग्य आणि सुख लाभो, अशी मी प्रार्थना करतो आणि आपली रजा घेतो,” असे साळवे यांनी नमूद केले.

नवीन डिवायएसपी विक्रांत गायकवाड यांच्याकडे आजपासून इचलकरंजी विभागाचा अधिकृत कार्यभार सोपविण्यात आला असून, येथील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी (Superintendent)ते कार्यरत राहतील.समीरसिंह साळवे यांच्या पुढील वाटचालीसाठी इचलकरंजीकरांकडून शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.
हेही वाचा :
सासऱ्याने केली अशी गोष्ट… वर्षा उसगांवकर यांच्या खासगी आयुष्यात अनेक वादळ
आता मराठा आरक्षण मिळवल्याशिवाय फेटा बांधणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं आव्हान
आम्ही तुम्हाला डिजीटल अरेस्ट करतोय, एक व्हिडीओ कॉल आणि… नाशिकमध्ये त्या चार लोकांसोबत काय घडलं?