जेंझींच्या आंदोलनानंतर एकनाथ शिंदेंची शिवसेना Action मोडवर, घेतला महत्वाचा निर्णय?

जंतर मंतर वर नुकतचं एक मोठं विद्यार्थी आंदोलन झालं. मोठ्या संख्येने तरुणाई खासकरुन झेंजी या आंदोलनात उतरले होते. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला.

जंतर मंतर वरील जेंझींच्या आंदोलनानंतर राज्यातील शिवसेना Action मोडवर आली आहे. 2029 रोजी देशात 38 कोटी तरूण हे झेंजी मतदार असतील. त्यासाठी शिवसेनेने खास मास्टर प्लान आखला आहे. शिवसेनेने लवकरच यासाठी ऐक बैठक बोलावण्यात आल्याची माहिती आहे. जेंझी तरूण मतदारांचे नेतृत्व करण्यासाठी शिवसेनेकडून योग्य चेहऱ्याची निवड करण्यात येणार आहे. (Jantar Mantar) यासाठी पक्षातील नेत्यांच्या तरुण मुलांना आणि विविध सामाजिक संघटनेत तरुणांचं नेतृत्व करणाऱ्या युवा चेहऱ्यांवर शिवसेना काम करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. शहरात आणि गावात असलेल्या या तरुण मतदारांसाठी एका मेळाव्याचे आयोजन करण्यावर पक्षांतर्गत विचार सुरू आहे. तरुणांच्या प्रश्नांवर आत्तापासून काम करण्याच्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षातील सर्व पदाधिकारी आणि नेत्यांना सूचना दिली आहे.

जंतर मंतर वर नुकतचं एक मोठं विद्यार्थी आंदोलन झालं. मोठ्या संख्येने तरुणाई खासकरुन झेंजी या आंदोलनात उतरले होते. त्यांच्या आंदोलनाच्या रेट्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एवढं मोठं आंदोलन झालं. भारतात युवकांची संख्या मोठी आहे. पुढच्या होणाऱ्या निवडणुकांमध्ये झेंजीची भूमिका महत्वाची ठरणार आहे. (Jantar Mantar) म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आत्ताच खबरदारी घेत पावलं उचलली आहेत.

2029 मध्ये देशात लोकसभेच्या आणि महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका आहेत. अशावेळी झेंजी मतदार ज्याच्यासोबत त्याचा फायदा जास्त होऊ शकतो. म्हणून भाजप-शिवसेनेने आत्तापासूनच रणनिती आखून काम करायला सुरुवात केली आहे. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी इन्स्टाग्रामवरुन सतत युवा मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. नीट पेपर फुटीमुळे देशात हे मोठं आंदोलन उभं राहिलं. पुन्हा असे प्रकार घडू नयेत, (Jantar Mantar) यासाठी केंद्र सरकारने संसदेत परीक्षा सुधारणा विधेयक मंजूर केलं. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने संसदेवर मार्च काढला होता. यावेळी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. त्यानंतर देशात या विद्यार्थी आंदोलनाबद्दल मोठी चर्चा सुरु झाली. अनेक सेलिब्रिटी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला.

हेही वाचा :

12 ऑगस्टला येणार नवी Bajaj Pulsar जाणून घ्या काय असेल खास?

शहरात दिवसभर दमदार तीन धरण क्षेत्रांत अतिवृष्टी?

इराणला चारही बाजूंनी घेरण्याची तयारी ? अमेरिकेच्या नव्या डावाची चर्चा?