ऑपरेशन सिंदूरमध्ये शहीद झालेल्या 6 वीर जवानांची नावे प्रथमच जाहीर राष्ट्रीय युद्ध स्मारकावर मिळणार?

पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेदरम्यान देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सहा शूर जवानांची नावे प्रथमच अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहेत. या सर्व शहीद जवानांची नावे आता नवी दिल्लीतील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कायमस्वरूपी कोरली जाणार (Operation) असून त्यांच्या शौर्याला राष्ट्राकडून अभिवादन करण्यात येणार आहे.

या सहा शहीदांमध्ये भारतीय लष्कराचे पाच जवान आणि भारतीय हवाई दलातील एका सार्जंटचा समावेश आहे. शहीदांमध्ये सुभेदार मेजर पवन कुमार, रायफलमन सुनील कुमार, लान्स नाईक दिनेश कुमार, अग्निवीर मूड मुरली नायक, हवालदार सुनील कुमार सिंग आणि सार्जंट सुरेंद्र कुमार यांचा समावेश आहे. देशाच्या सुरक्षेसाठी बजावलेल्या त्यांच्या योगदानाची अधिकृत नोंद आता राष्ट्रीय युद्ध स्मारकावर होणार आहे.या मोहिमेत दाखवलेल्या अद्वितीय शौर्यासाठी दोन जवानांना मरणोत्तर शौर्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. रायफलमन सुनील कुमार (Operation) यांना देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च युद्धकालीन शौर्य पुरस्कार ‘वीर चक्र’ मरणोत्तर प्रदान करण्यात आला, तर भारतीय हवाई दलाचे सार्जंट सुरेंद्र कुमार यांना मरणोत्तर ‘वायु पदक’ देऊन सन्मानित करण्यात आले. संरक्षण अलंकरण सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांना हे सन्मान प्रदान करण्यात आले.

राष्ट्रीय युद्ध स्मारकातील ‘त्याग चक्र’ हे देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या स्मृतीसाठी उभारण्यात आले आहे. या स्मारकातील ग्रॅनाइटच्या वर्तुळाकार भिंतींवर स्वातंत्र्यानंतर देशासाठी शहीद झालेल्या सैनिकांची नावे, पदे आणि युनिटची नोंद करण्यात येते. (Operation) आता ऑपरेशन सिंदूरमधील या सहाही वीर जवानांची नावेही या गौरवशाली स्मारकाचा कायमस्वरूपी भाग बनणार आहेत.देशाच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या या शूर जवानांचे शौर्य, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रसेवा कायम स्मरणात राहणार आहे. राष्ट्रीय युद्ध स्मारकावर कोरले जाणारे त्यांचे नाव भावी पिढ्यांना देशभक्ती, त्याग आणि समर्पणाची प्रेरणा देत राहील.

हेही वाचा :

राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?

श्रद्धा कपूरच्या अडचणी वाढल्या नेमकं काय घडलं?