पीएम किसानचा 23वा हप्ता कधी मिळणार?

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या 23व्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत असून, प्रत्येकी 2 हजार रुपयांचा पुढील हप्ता लवकरच खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (farmers) मात्र याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दरवर्षी लाखो शेतकऱ्यांना आर्थिक आधार केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या या योजनेत पात्र शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण 6 हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. पेरणी, बियाणे खरेदी, खते, औषधे आणि इतर शेतीविषयक खर्च भागवण्यासाठी हा निधी उपयोगी ठरतो. देशातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत. 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17वा हप्ता 18 जून रोजी वितरित केला होता. (farmers) त्यावेळी 9 कोटींपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा करण्यात आला होता.याच पार्श्वभूमीवर यंदाही जून महिन्यात पुढील हप्ता वितरित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक चार महिन्यांनी 2 हजार रुपयांचा एक हप्ता दिला जातो. अशाप्रकारे वर्षभरात तीन टप्प्यांत एकूण 6 हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात.

18 जूनच्या आसपास हप्ता येण्याची शक्यता सध्या 23व्या हप्त्याबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असून, येत्या 18 जूनच्या आसपास निधी वितरित केला जाऊ शकतो असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत केंद्र सरकार किंवा संबंधित विभागाकडून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. (farmers) त्यामुळे सोशल मीडियावरील किंवा अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवता अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करण्याचा सल्ला दिला जात आहे.योजनेचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेली नाही, त्यांना पुढील हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे लाभार्थींनी शक्य तितक्या लवकर ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सायबर फसवणुकीच्या घटना लक्षात घेता अनोळखी लिंक, फोन कॉल किंवा संदेशांपासून सावध राहण्याचा सल्लाही शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

हेही वाचा :

आंबे खाल्ल्यानंतर दोन बहीणींचा मृत्यू

NEET 2026 विद्यार्थ्यांना सर्वात मोठा दिलासा!

सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर