दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर कधीपासून सुरू होणार परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांची अंतिम वेळापत्रके जाहीर केली आहेत. (board exams) त्यानुसार दहावी आणि बारावीच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षांच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

बारावीच्या लेखी परीक्षेला ८ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे, (board exams) तर दहावीची लेखी परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होईल. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून याबाबतचे अधिकृत परिपत्रक जारी करण्यात आले आहे. विद्यार्थी आता मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपले वेळापत्रक पाहू शकतील.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये आयोजित करावयाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत.

इ. १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: बुधवार, २० जानेवारी २०२७ ते शनिवार, ६ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, ८ फेब्रुवारी २०२७ ते गुरुवार, १८ मार्च २०२७.

इ. १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) परीक्षा:
प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन: गुरुवार, २८ जानेवारी २०२७ ते शनिवार, १३ फेब्रुवारी २०२७.
लेखी परीक्षा: सोमवार, १५ फेब्रुवारी २०२७ ते सोमवार, १५ मार्च २०२७.

बोर्डाच्या अधिकृत www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर दिनांक ६ नोव्हेंबर २०२६ पासून हे वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे. संकेतस्थळावरील वेळापत्रक हे केवळ माहितीसाठी असून, शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत छापील स्वरूपात मिळणारे वेळापत्रकच अंतिम असेल. (board exams) त्यामुळे विद्यार्थ्यांनी छापील वेळापत्रकावरूनच परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी, असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. दिपक माळी यांनी केले आहे. तसेच व्हॉट्सॲप किंवा इतर सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट वेळापत्रकांच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा : 

मराठवाडा वॉटर ग्रीड प्रकल्पाला गती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज दुधाच्या दरात ४ रुपयांनी वाढ कुठे घेतला निर्णय

सांगलीतील बैठकही निष्फळ