ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस महाराष्ट्रातील पावसाची स्थिती बदलताना दिसत आहे. काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम सरींची शक्यता असली तरी अनेक ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याचा अंदाज आहे. 27 ऑगस्ट रोजी राज्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. मात्र, (Maharashtra) विशेष बाब म्हणजे कोणत्याही जिल्ह्यासाठी पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

कोकणातील बहुतांश भागांत आज हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो. पालघर, ठाणे , मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तुलनेने मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. मात्र, या संपूर्ण विभागातील कोणत्याही जिल्ह्याला हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. (Maharashtra) त्यामुळे पावसाची शक्यता असली तरी परिस्थिती अलर्टच्या पातळीवर नसणार आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि सांगली येथे हलक्या पावसाच्या सरींचा अंदाज आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होऊ शकतो. कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यांतील काही भागांतही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात धुळे , नंदुरबार , जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर येथे हलक्या सरींचा अंदाज असून, नाशिकच्या घाटमाथ्यावर मध्यम पाऊस होऊ शकतो. या दोन्ही विभागांसाठीही कोणताही पावसाचा अलर्ट नाही.
मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता कायम आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना , परभणी , बीड आणि धाराशिव येथे मेघगर्जनेसह हलक्या (Maharashtra) पावसाच्या सरी येऊ शकतात. हिंगोली , नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे. तरीही मराठवाड्यातील एकाही जिल्ह्यासाठी 27 ऑगस्ट रोजी पावसाचा अलर्ट जाहीर झालेला नाही.विदर्भातील अकोला, अमरावती , बुलढाणा , वाशिम , यवतमाळ , नागपूर , वर्धा , भंडारा, गोंदिया , चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठीही कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. या भागात बहुतांश ठिकाणी पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा :
तुमच्याकडील LPG कनेक्शन बंद होणार? मोदी सरकारचा काय आहे नवा प्लॅन?
देवेंद्र फडणवीस पंतप्रधान व्हावेत राज्यातील बड्या नेत्याची इच्छा राजकीय चर्चांना उधाण?