दिल्लीतून फडणवीसांनी आणली GOOD NEWS, दुष्काळासंदर्भात मोठी घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. (regarding) त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीसंदर्भात महत्वाची माहिती दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. “आपल्याला कल्पना आहे की,गृहमंत्री हे एनडीआरएफचे अध्यक्ष असतात. दुष्काळाच्या संदर्भात एनडीआरएफच्या मदतीसंदर्भात जे काही आपले प्रस्ताव असतात, ते या ग्रुपकडे पाठवले जातात. या बैठकीची अध्यक्षता अमित शाह करतात. (regarding) म्हणून आपण एनडीआरएफकडे प्रस्ताव पाठवलेला. त्याची कल्पना देण्यासाठी मी आलेलो. मी त्यांना सांगितलं की, महाराष्ट्राच प्रचंड दुष्काळ आहे. पिण्याच्या पाण्याची, चाऱ्याची समस्या आहे” असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं. “32 जिल्ह्यात दुष्काळ मोठ्या प्रमाणात आहे. जर विचार केला, तर 80 टक्के तालुके दुष्काळप्रभावित आहेत. म्हणून विशेष मदत केंद्र सरकारने महाराष्ट्राला करावी अशी विनंती केली. आम्ही प्रस्ताव पाठवतोय त्यावर केंद्राची टीम तात्काळ यावी अशी विनंती केली” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी सुद्धा चर्चा केली. ही टीम 8 तारखेपासून महाराष्ट्रात येईल. ही टीम 8 ते 11 विविध भागांमध्ये साधारणपणे दुष्काळी परिस्थिती काय आहे, याची मौका तपासणी करेल. ते आपला रिपोर्ट एनडीआरएफला सादल करतील. त्यांनी पाठवलेला रिपोर्ट आपण पाठवलेले प्रस्ताव यावर एनडीआरएफ निर्णय घेईल. त्या दृष्टीने वेगाने निर्णय होत आहेत” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

“मी विशेष विनंती केली आहे की, (regarding) दुष्काळी परिस्थिती पाहून विशेष मदत केंद्र सरकारने करावी. गृहमंत्र्यांनी सकारात्मकता दाखवली आहे. नियमात बसवून जास्तीत जास्त मदत भारत सरकार करेल असं आश्वासन दिलेलं आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “दुसरी बैठक राजनाथ सिंह यांच्यासोबत झाली. या बैठकीचा उद्देश नागपूर एअर पोर्टवरील नवीन टर्मिनल बिल्डिंगचा होता. 27 एकर जागा जी आहे, ती एअरफोर्सकडे आहे. ती जागा लवकरात लवकर आपल्याला मिळावीत तर काम वेगाने पूर्ण करता येतील. बैठक सकारात्मक झाली. टर्मिनल तयार करण्यासाठी जागा तात्काळ हँड ओव्हर करतील” अशी माहिती फडणवीसांना दिली.

हेही वाचा : 

राज्यातील साखर कामगार २२ ऑक्टोबर पासून बेमुदत संपावर कोल्हापुरात इशारा मोर्चावेळी घोषणा

MPSC च्या अध्यक्षांचा राजीनामा घेणार का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले

सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटना आई-बाळाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू