‘चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील, पण प्रदीप पूर्णेकर प्रकरणात शिंदेच्या खासदाराने ठेवली एकच अट

“संजय राऊत तुमच्यात हिम्मत असेल तर पाटकरांच्या ऑडिओ क्लिप टाका. स्वप्ना पाटकरांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. आम्हाला सुद्धा या गोष्टी करता येतात. पण अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला करायचं नाही” असं नरेश म्हस्के म्हणाले.

“पुरवणी एफआयआरमध्ये जबरदस्ती नाव टाकलेलं आहे. एफआयआरमध्ये नाव आहे म्हणून अटक करा बोलत असाल तर दिशा सालियन प्रकरणात पहिल्यापासून नाव आहे. दिशा सालियनच्या वडिलांनी म्हटलय की, मुख्यमंत्रीपदाचा आधार घेऊन पुरावे नष्ट केले. आदित्य ठाकरे जबाबदार आहे. (allegations) त्याला अटक करा. चला मिनाक्षी शिंदे स्वत:हून अटक होतील” असं ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के म्हणाले. “तुमच्यात हिम्मत असेल, मिनाक्षी शिंदेंना अटक करा म्हणत असाल तर दिशा सालियन प्रकरणात अटक करा. काय दुटप्पी धोरण लावलय. आता टीव्हीवर बघितलं, दिनो मारियोला साक्षीदार म्हणून बोलवलय. दिशा सालियन प्रकरण, मिठी नदी गाळ घोटाळ्यात त्याचं नाव आहे. तुमच्यासोबत सतत फिरत असतो” असं नरेश म्हस्के म्हणाले.

“त्याला सुद्धा चौकशीसाठी बोलावलं पाहिजे. कसल्या गप्पा मारताय. राजकारण करा पण आपल्या एका कार्यकर्त्याचा, पदाधिकाऱ्याचा मृत्यू झालाय त्याच्या मूळ गुन्हेगारांना अटक करण्याऐवजी प्रकरणाला वेगळं वळण देताय. कसलं राजकारण करताय” अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. प्रदीप पूर्णेकर प्रकरणावरुन आता शिंदे शिवसेना सुद्धा आक्रमक झाली आहे. “संजय राऊत कसल्या ऑडिओ क्लिप प्रकाशित करताय. संजय राऊत तुमच्यात हिम्मत असेल तर पाटकरांच्या ऑडिओ क्लिप टाका. स्वप्ना पाटकरांनी सुद्धा आरोप केलेले आहेत. आम्हाला सुद्धा या गोष्टी करता येतात. पण (allegations) अशा पद्धतीचं राजकारण आम्हाला करायचं नाही” असं नरेश म्हस्के म्हणाले.

प्रदीप पूर्णेकर प्रकरणात ठाकरे गट शिंदेंच्या शिवसेनेला गोवण्याचा प्रयत्न करत आहे. (allegations) म्हणून आता एकनाथ शिंदे शिवसेना दिशा सालियन प्रकरणावरुन आक्रमक झाली आहे. मिनाक्षी शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी दिशा सालियन प्रकरणावरुन प्रश्न विचारले. “दिशा सालियन प्रकरणात तिचे वडिल सहावर्ष पोलीस स्टेशनच्या चकरा मारत होते. त्या एफआयआरमध्ये आदित्य आणि उद्धव ठाकरेंच नाव आहे. मला संजय राऊतला एवढाच प्रश्न विचारायचा आहे की, ती पण कोणाची तरी मुलगी होती. अशावेळी तुम्ही आदित्य ठाकरेला अटक करा अशी मागणी केली का?”

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार