भारतीय क्रिकेट संघाच्या आगामी श्रीलंका दौऱ्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. ऑगस्ट महिन्यात भारत आणि श्रीलंका यांच्यात प्रस्तावित असलेली टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात असून, (Cricket) याबाबत दोन्ही क्रिकेट मंडळांमध्ये चर्चा झाल्याचे वृत्त आहे. अंतिम निर्णय अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नसला तरी टी-20 मालिकेचे आयोजन होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.

सध्याच्या नियोजनानुसार भारतीय संघ ऑगस्टमध्ये श्रीलंका दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळणार आहे. (Cricket) मात्र त्यासोबत प्रस्तावित तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. भारतीय संघाचे व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक आणि इतर नियोजनात्मक कारणांमुळे या मालिकेवर परिणाम झाल्याचे बोलले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीलंकेत गेल्या वर्षी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीनंतर मदतनिधी उभारण्याच्या उद्देशाने अतिरिक्त टी-20 मालिकेचे आयोजन करण्याचा विचार दोन्ही क्रिकेट मंडळांनी केला होता. मात्र सध्याच्या परिस्थितीत या मालिकेचे आयोजन शक्य होणार नसल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, भारतीय संघ जुलै महिन्यात झिंबाब्वेविरुद्ध टी-20 मालिका खेळणार असून (Cricket) त्यानंतर श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. कसोटी मालिकेच्या कार्यक्रमात कोणताही बदल होण्याची शक्यता नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र टी-20 मालिकेबाबत अंतिम निर्णय आणि अधिकृत घोषणा दोन्ही क्रिकेट मंडळांकडून येणे अद्याप बाकी आहे.
हेही वाचा :
राजकीय खळबळ विलास घुले खून प्रकरणात खासदार पुत्राला अटक होणार?
घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू?