पुणे आणि नाशिक दरम्यान प्रस्तावित हायस्पीड रेल्वे प्रकल्पासह राहुरी शनिशिंगणापूर रेल्वे मार्गाबाबत महत्त्वाची हालचाल सुरू झाली आहे. या दोन्ही प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.

विधानभवनात झालेल्या विशेष बैठकीत पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे आणि राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्षस्थानी होते. त्यांनी सांगितले की, या दोन्ही महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांबाबत केंद्र सरकारच्या स्तरावर सकारात्मक निर्णय व्हावा यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील. या मार्गांमुळे पुणे आणि नाशिक यांच्यात वेगवान रेल्वे संपर्क निर्माण होईल, (railway) ज्याचा फायदा राज्याच्या विकासालाही होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी नाशिक, अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेणार आहे. रेल्वे प्रकल्पाशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा करून अडचणी दूर करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रभावी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबतही या प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ दिल्लीत जाऊन केंद्र सरकारसमोर या रेल्वे मार्गाचे महत्त्व मांडणार आहे. पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वेमुळे उद्योग, व्यापार आणि प्रवासाला मोठी चालना मिळेल, (railway) तसेच तिन्ही जिल्ह्यांच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
बैठकीत राहुरी-शनिशिंगणापूर रेल्वे मार्गावरही सविस्तर चर्चा झाली. या प्रकल्पासंदर्भात शेतकऱ्यांच्या भावना आणि स्थानिकांच्या अपेक्षा मुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्या जाणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले. यावेळी आमदार दिलीप वळसे पाटील यांनीही बैठकीत सहभाग घेतला. (railway) त्यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी झालेल्या चर्चेचा उल्लेख करत जीएमआरटी संदर्भातील अडचणी दूर करण्याची शक्यता व्यक्त केली.
हेही वाचा :
मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!
महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?
Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?