आमदाराचा तडकाफडकी राजीनामा १११ आमदार असलेल्या पक्षात खळबळ?

उत्तर प्रदेशातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि मुरादाबाद जिल्ह्यातील कांठ विधानसभा मतदारसंघाचे आमदार कमाल अख्तर यांनी विधिमंडळातील मुख्य प्रतोद (चीफ व्हिप) पदाचा राजीनामा दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून विरोधी पक्षातील काही नेते (onstituency) सत्ताधारी भाजपमध्ये जाणार का, अशी चर्चा रंगू लागली आहे.

कमाल अख्तर यांनी आपल्या राजीनाम्यामागे कोणताही वाद नसल्याचे स्पष्ट केले आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या सूचनेनुसार आपण मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिल्याचे त्यांनी सांगितले. “अखिलेश यादव हे आमचे नेते आहेत. (onstituency) त्यांच्या आदेशाचे पालन करणे हे आमचे कर्तव्य आहे,” असेही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कमाल अख्तर आणि समाजवादी पक्षाच्या मुरादाबादच्या खासदार रुची वीरा यांच्यात मतभेद असल्याची चर्चा सुरू होती. पक्षातील वाढत्या गटबाजीमुळे हा वाद पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी लखनौमध्ये अखिलेश यादव यांनी दोन्ही नेत्यांसोबत बैठक घेऊन मतभेद दूर करण्याचा प्रयत्न केला होता.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधातील तक्रारी मांडल्याचे सांगितले जाते. अखिलेश यादव यांनी मध्यस्थी करत हा वाद मिटल्याचे संकेत दिले होते. मात्र त्यानंतर अचानक कमाल अख्तर यांनी मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चांना वेग आला आहे.दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय हालचालींनंतर आता उत्तर प्रदेशातही विरोधी पक्षातील नेत्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र कमाल अख्तर यांनी पक्ष सोडण्याबाबत कोणतेही संकेत दिलेले नाहीत. (onstituency) त्यामुळे त्यांच्या राजीनाम्यामागे केवळ संघटनात्मक फेरबदल आहे की त्यातून आणखी मोठी राजकीय घडामोड होणार, याकडे आता उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?