WhatsApp वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी महत्त्वाच्या फीचरबाबत केंद्र सरकार अलर्ट?

व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. मात्र, हे फीचर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे

जगातील अनेक लोक व्हॉट्सॲप वापरतात. व्हॉट्सॲपने अलीकडेच आपल्या युजर्ससाठी युजरनेम रिझर्वेशन फीचर सुरू केले आहे. या फीचरमुळे मोबाईल नंबर शेअर न करता फक्त युजरनेमच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधता येणार असून चॅटिंग करता येणार आहे. मात्र, हे फीचर आता अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. (WhatsApp users) आता केंद्र सरकार त्याची चौकशी करू करू शकते, अशी माहिती समोर आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.व्हॉट्सॲपच्या या फीचरमुळे ऑनलाइन फसवणुकीच्या घटना वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार गोपनीयता आणि सुरक्षेच्या दृष्टीने त्याचा अभ्यास करत आहे. या नव्या युजर आयडी फीचरचा गैरवापर होण्याची भीती व्यक्त होत असल्याने त्यावर वादही सुरू झाला आहे. त्यामुळे सरकार या फीचरच्या प्रत्येक पैलूची तपासणी करणार आहे.

सरकारला तपासादरम्यान काही त्रुटी किंवा नियमभंग आढळल्यास मेटा कंपनीला नोटीसही पाठवली जाऊ शकते. या प्रकरणात भारतातील विद्यमान कायदे आणि नियमांच्या आधारे सरकार पुढील निर्णय घेणार आहे. सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या फीचरचे बारकाईने मूल्यमापन केले जाणार आहे.व्हॉट्सॲपच्या या फीचरमुळे मोबाईल नंबर न देता कोणाशीही चॅट सुरू करता येणार आहे. (WhatsApp users) यामुळे वापरकर्त्यांची गोपनीयता वाढेल, असा दावा कंपनीने केला असला तरी त्याचा गैरवापर होण्याची शक्यता अधिक असल्याचे मानले जात आहे. प्रत्येक व्यक्ती स्वतःसाठी युनिक युजरनेम तयार करू शकणार असून तो आवश्यकतेनुसार अनेक वेळा बदलूही शकणार आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीने युजरनेम बदलल्यास त्याचा शोध घेणे कठीण होऊ शकते, अशी सरकारची चिंता आहे.व्हॉट्सॲपवर अकाउंट खाते तयार करण्यासाठी आणि व्हेरिफिकेशनसाठी मोबाईल नंबर पूर्वीप्रमाणेच अनिवार्य राहणार आहे. मात्र, इतर वापरकर्त्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि चॅट करण्यासाठी युजरनेमचा वापर केला जाईल. व्हॉट्सॲपसाठी हे फीचर नवीन असले तरी टेलिग्रामवर अशा प्रकारची सुविधा आधीपासून उपलब्ध आहे. (WhatsApp users) आता सरकारने यावर आक्षेप न घेतल्यास हे फीचर व्हॉट्सॲपवर पहायला मिळण्याची शक्यता आहे.

हेही वाचा :

मी बोलायला लागलो, तर सहन होणार नाही..!

महाबळेश्वरला जाताय तर सावधान पर्यटकांसाठी प्रसिद्ध पॉईंट बंद?

Jio आणि Airtel यूजर्स सावधान Gmail खात्याबाबतची ही चूक ठरू शकते धोकादायक?