डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? मिड-टर्म निवडणुकीसाठी मतदान सुरू नोव्हेंबरमध्येच?

अमेरिकेत मिडटर्म निवडणुकांसाठी मतदान सुरू झाले असून, हे ट्रम्प यांच्या राजकीय भविष्यासाठी महत्त्वाचे आहे. काँग्रेस, गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचरसाठी होणाऱ्या या निवडणुकीत महागाई, इराण संघर्ष आणि इमिग्रेशनसारखे मुद्दे निर्णायक ठरत आहेत. रिपब्लिकन बहुमत कायम राखणार की ट्रम्प यांना धक्का बसणार, हे नोव्हेंबरमध्ये स्पष्ट होईल.

अमेरिकेत 2026च्या मिडटर्म निवडणुकीचं काउंटडाउन सुरू झालं आहे. व्हर्जिनियात आज मतदानाला सुरुवात झाली आहे. इडाहो, मिनेसोटा आणि साउथ डकोटासारख्या काही राज्यातही मतदार निवडणूक कार्यालय आणि वोटिंग सेंटवर जाऊन अब्सेंटी बॅलेट वोट टाकत आहेत. येत्या आठवड्यातही मोठ्या प्रमाणावर अर्ली वोटिंग सुरू होणार आहे. (Donald Trump) त्यामुळे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं काय होणार? ट्रम्प यांना धक्का बसणार की पुन्हा पुनरागमन होणार? अशी चर्चा सध्या जगभरात सुरू आहे.

3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत अमेरिकन काँग्रेसच्या जागांसोबत अनेक राज्यात गव्हर्नर आणि स्टेट लेजिस्लेचरसाठीही मतदान होणार आहे. या निवडणुकीत सर्वाधिक जास्त लक्ष हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हस आणि सिनेटवर असणार आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहात रिपब्लिकन बहुमत कायम ठेवणार की नाही हे या निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.या निवडणुकीत डेमोक्रॅट्स काँग्रेसला बहुमत मिळालं तर ट्रम्प (Donald Trump) यांच्या शेवटच्या दोन वर्षाच्या राजकीय कारकिर्दीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. काँग्रेसमध्ये चौकशी आणि सरकारच्या कामकाजाशी संबंधित घटना घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरमध्ये ट्र्म्प यांचं राजकीय भविष्यही ठरणार आहे.

या निवडणुकीत अमेरिकन मतदारांसमोर अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. गॅस आणि किराणा सामानाच्या वाढत्या किंमतीने चिंता वाढली आहे. त्यााशिवाय इराणसोबत सुरू असलेलं दीर्घकाळापासूनच युद्ध, आर्टिफिशियल इंटेलिजेन्सशी संबंधित धोके आणि ट्रम्प यांनी कठोरपणे राबवलेली इमिग्रेशन कारवाई हे या निवडणुकीतील महत्त्वाचे मुद्दे आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या (अमेरिकन संसद) जागा आणि सीमांमध्ये फेरबदल झाला आहे. अनेक राज्यांमध्ये नवीन नकाशे तयार करण्यात आले आहेत. त्याला ‘काँग्रेसनल मॅप’ असं नाव दिलं गेलं आहे. या बदलामुळे 10 पैकी एक अमेरिकन नागरिक अशा काँग्रेसनल राज्यांतर्गत आले आहेत. 2024मध्ये या जिल्ह्याशी त्यांचा काही संबंध नव्हता.

निवडणुकीपूर्वी पासूनच निवडणूक प्रक्रियेत ट्रम्प प्रशासनाचा हस्तक्षेप असल्याची चर्चा आहे. मतदान प्रक्रियेत काही बदल झाले पाहिजे, अशी गेल्या काही काळापासूनची ट्रम्प यांची मागणी आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेवरच सवाल केले होते. जे अमेरिकन नाहीत, त्यांच्या मतदानाच्या अधिकाराबाबतही ते बोलत आहेत.दरम्यान, एका रिपोर्टमध्ये, जे अमेरिकन नाहीत त्यांना मतदानाचा अधिकार असणं दुर्भाग्याची गोष्ट असल्याचं मह्टलं आहे. (Donald Trump) याच आठवड्यात मेल बॅलेटवर बंदी घालण्याचा ट्रम्प यांचा प्रयत्न सुप्रीम कोर्टाने हाणून पाडला आहे.

हेही वाचा : 

संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले?

राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या नवी तारीख काय?

कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलवर आजपासून सैन्‍य भरती?