तामिळनाडूचे मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आली होती. DMK आमदार जीवी मार्कंडेयन यांना याप्रकरणात कोर्टात मोठा झटका बसला आहे. काय आहे हे प्रकरण आणि काय सुनावले कोर्टाने?

तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांना धमकी दिल्याचे प्रकरण तापले आहे. विलाथिकुलमचे DMK पक्षाचे आमदार जीवी मार्कंडेयन यांना कोर्टात मोठा झटका बसला. बुधवारी, 22 जुलै रोजी थुथुकुडी न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. थुथुकुडीचे न्यायदंडाधिकारी सुमती यांच्यासमोर प्रकरणात सुनावणी झाली. सरकारी पक्षाने थेट मुख्यमंत्र्यांनाच धमकी दिल्याने जामीनाला कडाडून विरोध केला. तर मार्कंडेयन यांच्या वकिलाने दावा केला की, ते गेल्या 11 तासांपासून पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांची सलग चौकशी करण्यात आलेली आहे. ते लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. (breaking) त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याची कोणतीही गरज नाही. दोन्ही पक्षांची बाजू ऐकल्यानंतर न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन देण्याची विनंती फेटाळली. गेल्या शनिवारी कोविलपट्टी येथील भव्य सभेत मार्कंडेयन यांचा ताबा सुटला आणि त्यांनी मुख्यमंत्री विजय यांचे हातपाय तोडण्याचे वक्तव्य भरसभेत केले. त्यांना तातडीने अटक करण्यात आली.
दाखल एफआयआरनुसार, जाहीर सभेत DMK आमदार मार्कंडेयन यांनी विजय यांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. त्यांनी प्रक्षोभक भाषण केले. त्यांच्याविरोधात पोलिसांनी BNS कायद्याच्या विविध कलमातंर्गत गुन्हा नोंदवला.(breaking) त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांचा जामीन अर्जाची विनंती फेटाळण्यात आली. मार्कंडेयन यांना 3 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
धमकीचे महाभारत घडूनही मार्कंडेयन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. मुख्यमंत्री विजय यांच्याविषयी त्यांच्या मनातील राग कायम असल्याचे दिसले. पोलिसांच्या गाडीत बसत असताना त्यांनी समर्थकांशी संवाद साधला. तेव्हा, “तुरुंगातील परिस्थिती सध्या चांगली आहे. मी तिथे आनंदात आहे. मला आता पुन्हा जामीन अर्ज करण्याची कोणतीच गरज नाही.” असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांची ही प्रतिक्रिया तामिळनाडूमध्ये व्हायरल झाली आहे. त्यांना या सर्व घटनाक्रमाचा कोणताही फरक पडला नसल्याचे दिसून आले.
तामिळनाडून विधानसभेचे अध्यक्ष प्रभाकर यांनी या घटनाक्रमावर मत व्यक्त केले. द्रमुकचे आमदार जीवी मार्कंडेयन यांनी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्यावर जी टिप्पणी केली, त्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. जर कोणी मार्कंडेयन यांच्याविरोधात माझ्याकडे योग्य आणि लिखित तक्रार केली तर त्यावर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे मोठे संकेतही विधानसभा अध्यक्षांनी दिले. (breaking) यामुळे जीवी मार्कंडेयन यांची आमदारकी धोक्यात आल्याचे मानले जात आहे.
हेही वाचा :
हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?