जंतरमंतरवरील रात्रीच्या राड्यानंतर आता कशी आहे परिस्थिती? रात्री नेमकं काय घडलं?

आंदोलकांनी रात्रभर लाल सिग्नलवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असल्याचे दिसून आले. काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते, तर काहींनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. काहींनी स्पायडर-मॅनचे मुखवटे घातले होते

पेपरफुटी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनात बुधवारी पुन्हा मोठा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. जंतरमंतरवर रात्री साडेआठच्या सुमारास दिल्ली पोलिस आणि विद्यार्थ्यांध्ये चकमक झाली. या चकमकीत विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये रात्री उशिरापर्यंत मोठा संघर्ष सुरू होता. विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये घडलेल्या चकमकीमुळे जंतरमंतरवर पुन्हा दगडफेकीच्याही घटना घडल्या. (barricades) यात काहीजण पुन्हा गंभीर जखमी झाले.आंदोलक आणि पोलिसांमधील संघर्ष रात्री उशिरापर्यंत झालेल्या संघर्षानंतर आज सकाळपर्यंत परिस्थिती सामान्य झाल्याचे दिसत होते. अजूनही मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत. दिल्ली पोलीस ड्रोनच्या साहाय्याने आंदोलकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. दिल्ली पोलीस आणि सरकारविरोधात घोषणाबाजीही केली जात आहे.

आंदोलकांनी रात्रभर लाल सिग्नलवर गोंधळ घातला आणि पोलिसांचे बॅरिकेड्स हटवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली पोलिसांचे अधिकारी रात्रभर बॅरिकेड्सवर तैनात असल्याचे दिसून आले. (barricades) काही आंदोलकांनी आपले चेहरे झाकले होते, तर काहींनी आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न केला. काहींनी स्पायडर-मॅनचे मुखवटे घातले होते, तर काहींनी रुमाल बांधले होते. जंतर मंतरवरील आंदोलनाचा आज ३४ वा दिवस आहे. मात्र, गेल्या चार रात्रींपासून आंदोलनाची तीव्रता वाढली असून, जंतर मंतरवरील गर्दी सातत्याने वाढत आहे. सकाळीसुद्धा सीजेपीचे हजारो समर्थक उपस्थित होते.

या चकमकीनंतर सीजेपी अध्यक्ष अभिजीत दीपके म्हणाले की, आतापर्यंत आंदोलन शांततेत सुरू होते, पण एका महिन्यानंतर बाहेरून गुंड पाठवण्यात आले आहेत, जे वातावरण बिघडवत आहेत. आंदोलनात मुद्दाम अडथळा आणण्यासाठी बाहेरून लोकांना पाठवले जात आहे. आम्ही महिनाभर इथे बसलो आहोत. महिनाभरात अशी कोणतीही घटना घडली नाही, पण आता आंदोलन वाढल्यामुळे भाजप बाहेरून गुंड पाठवून इथल्या विद्यार्थ्यांना चिथावणी देत ​​आहे. खुद्द भाजपच दगडफेक करत आहे. पोलीसांनीच इथे दगडांनी भरलेले ट्रक आणले आणि आता भाजपचे गुंड येऊन दगडफेक करत आहेत. त्यामुळे सीजेपीचे आंदोलन बदनाम करत आहेत.’ असा आरोप अभिजीत दिपके यांनी केला आहे.यापूर्वी, काल रात्री सुमारे ८ वाजेपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलकांची संख्या ३,००० ते ४,००० पर्यंत वाढली होती आणि रात्री उशिरापर्यंत सातत्याने जंतर मंतरवर येणाऱ्याचा ओघ वाढतच चालला होता. पण जंतरमंतर वर समाजकंटक जमले होते, काही आंदोलक जमावात सामील झाले, त्यांनी आधी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि नंतर पोलिसांवर दगडफेक केली. हिंसक जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना सौम्य बळाचा वापर करावा लागला.

या संघर्षात दोन एसीपी, दोन इन्स्पेक्टर आणि एका कॉन्स्टेबलसह पाच पोलीस जखमी झाले. (barricades) अनेक आंदोलकही जखमी झाले. नवी दिल्लीतील जंतर मंतर, टॉल्स्टॉय मार्ग आणि पार्लमेंट स्ट्रीट येथील एनडीएमसी इमारतीसमोर जमाव जमला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती शांत करण्यासाठी पोलिसांनी सीजेपी नेते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्याशी चर्चा केली, परंतु जमावाने ऐकले नाही.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन दिवसांपासून पोलीस आणि आरएएफ यांच्यात अशाच प्रकारच्या चकमकी होत आहेत. काही समाजकंटक संध्याकाळी जमावात सामील होत असून, हे बाहेरील लोक गोंधळ निर्माण करून तणाव वाढवत आहेत.डीएमआरसीने सकाळी ७:३० वाजल्यापासून राजीव चौक, सुप्रीम कोर्ट, मंडी हाऊस आणि आयटीओ यासह १६ रेल्वे स्थानके बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली मेट्रोच्या एका पोस्टनुसार, लोक कल्याण मार्ग, पटेल चौक, रामकृष्ण आश्रम मार्ग, बाराखंबा रोड, सेवा तीर्थ, जनपथ, सेंट्रल सेक्रेटरीएट, दिल्ली गेट, इंद्रप्रस्थ, खान मार्केट, जोर बाग आणि शिवाजी स्टेडियम ही मेट्रो स्थानके पुढील सूचना मिळेपर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?