गगनबावड्यासह 12 धरण क्षेत्रांत अतिवृष्टी राधानगरी धरणात 85 टक्के पाणीसाठा, कोल्हापूर जिल्ह्यातील 21 बंधारे पाण्याखाली?

कोल्हापूर जिल्ह्यात सर्वच भागात मुसळधार पाऊस पडला. सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात ६७.२ मिमी. इतका झाला. (Gaganbawada) जिल्ह्यातील २१ बंधारे पाण्याखाली गेले. जिल्ह्यातील १२ धरण क्षेत्रांत अतिवृष्टी झाली असून, पाणीसाठ्यातही वाढ झाली (गगनबावडा येथील आजच्या पावसाची माहिती) आहे.

राधानगरी धरण ८५ टक्के भरले आहे. नदीची पाणीपातळी रात्री १२ वाजता २९ फूट ९ इंच इतकी होती. पुढील दोन दिवस पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. २४ तासांत जिल्ह्यात २२.९६ मिमी. पावसाची नोंद झाली. (Gaganbawada) यामध्ये सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात पडला आहे.

हातकणंगलेत ७.४ मिमी., शिरोळमध्ये ४.१ मिमी., पन्हाळ्यात ४.१ मिमी., शाहूवाडीमध्ये २१.५ मिमी., राधानगरीमध्ये ३६ मिमी., करवीरमध्ये ९.९ मिमी., कागलमध्ये १५.६ मिमी., गडहिंग्लजमध्ये २०.७ मिमी., भुदरगडमध्ये १८.६ मिमी., आजरा तालुक्यात २३.८ मिमी., चंदगड तालुक्यात २३.८ मिमी.असा एकूण २२.९६ मिमी. पावसाची नोंद झाली.

पाण्याखाली असणारे बंधारे
पंचगंगा नदीवरील – शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
कासारी नदीवरील – यवलूज, पुनाळ तिरपण व ठाणे आळवे
भोगावती नदीवरील-सरकारी कोगे, खडक कोगे, हळदी व राशिवडे
वेंदगंगा नदीवरील -निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे व सुरुपली, कुंभी नदीवरील सांगरुळ
दूधगंगा नदीवरील -दत्तवाड

अतिवृष्टी झालेले धरण क्षेत्र (पाऊस मिमी.मध्ये)
राधानगरी (११२), तुळशी (१०३), दूधगंगा (९२), कडवी (६५), पाटगाव (११२), चिकोत्रा (९४), घटप्रभा (८५), जांबरे (८२), सर्फनाला (१४०), धामणी (८५), कोदे (८७)

धरणातील पाणीसाठा (टीएमसी)
धरण पाणीसाठा क्षमता आजचा पाणीसाठा टक्के
राधानगरी ८.३६ ६.८५ ८२
तुळशी ३.४७ २.२६ ६५
वारणा ३४.४० २४.५२ ७१
दूधगंगा २५.३९ ११.३९ ४५
कासारी २.७७ १.८५ ६७
कडवी २.५२ १.७६ ७०
कुंभी २.७२ १.७० ६३
पाटगाव ३.७२ २.११ ५७
चिकोत्रा १.५२ ०.६८ ४५
चित्री १.८९ १.४६ ७८
जंगमहट्टी १.२२ ०.९३ ७६
घटप्रभा १.५४ १.५६ १००
जांबरे ०.३० ०.८२ १००
आंबेओहोळ ३५.११ ०.९९ ८०
सर्फनाला ०.६७ ०.६७ १००
धामणी ३.८५ १.२९ ३४
कोदे ०.२१ ०.२१ १००

हेही वाचा :

हेरवाडमध्ये पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाणी गळतीने वाया?

पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्यात ₹3000 ची वाढ होणार?

या 4 राशींसाठी शुभ ठरणार सूर्य गोचर, धनलाभ होणार?