मुंबईत गेल्या काही दिवसात धो धो पाऊस कोसळला आहे. मुसळधार पावसाने मुंबईकरांवरील(mumbait) पाणी कपातीचे संकट मिटले आहे. मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा साठा लक्षणीयरित्या वाढला आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या सातपैकी 4 तलाव ओसंडून वाहत आहेत. तर इतर धरणातही चांगला जलसंचय झाला आहे. मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. तर मुंबईसह परिसराला हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट दिल्याने अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पालघर परिसरात पूरस्थिती
पालघर जिल्ह्यात जोरदार वाऱ्यांसह झालेल्या(mumbait) धुवाधार पावसामुळे अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या 24 तासांत तलासरी येथे सर्वाधिक 456 मिमी पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ डहाणू येथे 419 मिमी आणि बोईसरमध्ये 355 मिमी पाऊस पडला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई विद्यापीठाने पालघर जिल्ह्यातील गुरुवारी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
दाहोद परिसरावरील कमी दाबाचे क्षेत्र, हवेचा पट्टा आणि प्रचंड ढगनिर्मितीमुळे पालघर जिल्ह्यात सातत्याने(mumbait) बाष्पयुक्त ढग जमा होऊन मुसळधार पाऊस कोसळत आहे. महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 दिवस मान्सून पूर्णपणे सक्रिय असेल. पुण्याच्या घाटमाथ्यावर अत्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रायगड या कोकणातील जिल्ह्यांसह सातारा आणि नाशिकच्या घाटमाथ्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि गुजरातच्या काही भागात 24 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुसळधार पावसाची शक्यता पाहता घाटमाथ्यावरील रहिवासी आणि प्रवाशांनी योग्य ती काळजी घेण्याचे हवामान खात्याने आवाहन केले आहे.
तलावात किती पाणीसाठा?
मागील काही तासांत धरण क्षेत्रात जोरदार पावसामुळे(mumbait) पाण्याची आवक वाढली आहे. चार जलाशय ओसंडून वाहत असल्याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार, बुधवारी सातही तलावांमध्ये 10,09,432 दशलक्ष लिटर इतका पाणीसाठी उपलब्ध होता. या तलावांची एकूण साठवणूक क्षमता 14.47 लाख दशलक्ष लिटर इतकी आहे. पैकी 69.74 टक्के इतका पाणीसाठा आहे. तर येत्या काही दिवसातील पावसाची आगेकूच पाहता हा साठा लवकरच वाढण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत जलाशयातील पाणीसाठा 86.88 टक्के इतका होता. अजून 16 टक्क्यांची तूट आहे. पण पावसाचा जोर पाहता लवकरच धरणं पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसात मुंबईकरांचा पाणी पुरवठा सुरळीत असेल हे नक्की.
मुंबईला पाणी पुरवठा करणारी सात धरणं
भातसा, मोडक सागर, अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, तानसा, विहार आणि तुळसी हे मुंबईला(mumbait) पाणी पुरवठा करणारी सात धरणं आहेत. ती मुंबई, ठाणे, पालघर आणि नाशिक जिल्ह्यात आहेत. मान्सूनच्या पावसावरच या सर्व जलाशयाचा पाणी पुरवठा अवलंबून असतो.
हेही वाचा :
केंद्रीय मंत्रिमंडळात मोठा फेरबदल होणार शिंदेंच्या वाट्याला किती मंत्रिपदे येणार?
सुप्रिया सुळेंच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट डॉक्टरांनी दिला ‘व्हॉइस रेस्ट’चा सल्ला?