लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, तटकरेंनी शेवटी सांगून टाकलं, थेट म्हणाल्या मुख्यमंत्री?

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या महिलांची ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, (Ladki Bahin Yojana) त्यांना आता पुन्हा एकदा ही प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत, पुढील सहा महिन्यांच्या कालावधीत पात्र महिलांना ई-केवायसी पूर्ण करता येणार असल्याचे स्पष्ट केले.

लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. अनेक महिलांची ई-केवायसी प्रलंबित असल्याने त्यांना लाभ मिळण्यात अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेऊन सरकारने ई-केवायसीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, यामुळे हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे. (Ladki Bahin Yojana) दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने या योजनेअंतर्गत मिळणारी आर्थिक मदत १,५०० रुपयांवरून २,१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. याबाबत विचारणा झाल्यानंतर आदिती तटकरे यांनी वाढीव लाभ कधीपासून लागू होणार याबाबत कोणतीही निश्चित तारीख सांगितलेली नाही. त्यांनी सांगितले की, सध्या सरकारचे लक्ष ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यावर असून, योजनेच्या पुढील निर्णयाबाबत मुख्यमंत्री अंतिम भूमिका घेतील.तटकरे यांनी लाडकी बहीण योजना राज्यात यशस्वीपणे राबवली जात असल्याचे सांगत, लाभाची रक्कम वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे स्पष्ट केले. (Ladki Bahin Yojana) त्यामुळे २,१०० रुपयांच्या वाढीव हप्त्याबाबतचा अंतिम निर्णय येत्या काळात होण्याची शक्यता असून, लाखो लाभार्थी महिलांचे लक्ष आता सरकारच्या पुढील घोषणेकडे लागले आहे.

हेही वाचा :

दिवसा होणार अंधार, ऑगस्ट महिन्यात मोठे सूर्यग्रहण, तब्बल इतके तास?

जंतर-मंतर चे ग्रहण सुटलं

नीटनंतर MPSC चा महत्वाचा पेपर फुटल्याचा धक्कादायक दावा, संपूर्ण राज्यात खळबळ?